प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्तीक रजा मंजूर करणेबाबत shikshan sevak naimittik leave
प्रस्तावना :- राज्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्यामध्ये सुधारित प्राथमिक शिक्षक सेवक योजना वरील संदर्भीय दि. २७/२/२००३ च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयातील जोडपत्र ‘अ’ मधील परिच्छेद १४ (१) नुसार शिक्षण सेवकांना शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत ५ दिवसाची अनुपस्थिती मानधनासाठी ग्राहय धरण्यात आली आहे. परंतु, त्यांना प्राथमिक शिक्षकांप्रमाणे नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आलेल्या नव्हत्या, यास्तव, राज्यातील प्राथमिक शिक्षण सेवकांना इतर नियमित प्राथमिक शिक्षकांप्रामाणे नैमित्तीक रजा मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन शुद्धीपत्रक :- या आदेशाद्वारे संदर्भीय दि. २७/२/२००३ च्या शासन निर्णय जोडपत्र ‘अ’ मधील परिच्छेद १४ (१) रद्द करुन त्या ऐवजी परिच्छेद १४ (१) खालील प्रमाणे अंतर्भूत करण्यात येत आहे :-
“१४(१) शासकीय कर्मचाऱ्यांला किंवा प्राथमिक शिक्षकाना देय असलेल्या कोणत्याही स्जा प्राथमिक शिक्षण सेवकाला अनुज्ञेय असणार नाहीत. परंतु नियमित प्राथमिक शिक्षकांप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या १२ नैमित्तीक रजा प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण सेवकांनाही अनुज्ञेय राहतील. जर शिक्षण सेवकाची नियुक्ती १२ महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी असेल तर दरमहा १ या प्रमाणे नैमित्तीक रजा अनुज्ञेय राहतील. एका शैक्षणिक वर्षात यापेक्षा अधिक नैमित्तीक स्जा उपभोगल्यास तेवढी
रक्कम त्यांच्या संबंधित महिन्याच्या मानधनातून कापून घेण्यात यावी. सदर नैमित्तीक
रजा शैक्षणिक वर्ष २००५-०६ पासून अनुज्ञेय राहतील. ”
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने