राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला ३ वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत varishtha vetan shreni kalavadhi
वाचा –
१) शासन निर्णय, शिक्षण व सेवायोजन विभाग, क्र. चवेआ २०८९/१११/माशि-२, दि. २ सप्टेंबर, १९८९
२) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्र. पीआरई २००२/३३९५/प्राशि-१, दि. २७ फेब्रुवारी, २००३
३) निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्र. एसएसएन १०९९/(३०८/९९)/माशि-२, दि. २८ नोव्हेंबर, २००६
प्रस्तावना –
राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना दिनांक १.१.१९८६ पासून चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक २ सप्टेंबर, १९८९ च्या शासन निर्णयान्वये त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये वरिष्ठश्रेणी आणि निवडश्रेणी अनुज्ञेय होण्यासाठी अटी विहित केल्या आहेत. त्यानंतर दिनांक २७ फेब्रुवारी, २००३ च्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये सुधारीत प्राथमिक शिक्षण सेवक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दिनांक २७ फेब्रुवारी, २००३ च्या शासन निर्णयानुसार, संबंधित आस्थापनेवर मंजूर असलेल्या पदांच्या मर्यादेतच शिक्षण सेवक नियुक्त करण्यात येतात. मात्र शासनाच्या काटकसरीच्या धारेणानुसार त्यांना तीन वर्ष नियमित वेतनश्रेणी ऐवजी मानधन देण्यात येते. दिनांक १४ मे २०१२ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार शिक्षण सेवक हे पदनाम सहायक शिक्षक (परिविक्षाधीन) असे सुधारित करण्यात आले आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक म्हणून व्यतित केलेली सेवा अन्य अटींची पूर्तता करीत असल्यास, वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राहय धरणेबाबतचा निर्णय शासनाने दिनांक २८ नोव्हेंबर, २००६ अन्वये घेतला आहे. त्या शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणेच राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक (आता सहायक शिक्षक (परिविक्षाधीन)) पदावर व्यतित केलेला तीन वर्षाचा सेवा कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राहय धरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय –
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार १२ वर्षानंतर अनुज्ञेय असलेली वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक (आता सहायक शिक्षक (परिविक्षाधीन)) पदावर व्यतित केलेला तीन वर्षाचा सेवा कालावधी वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राहय धरण्यात यावा.
शासन निर्णय क्रमांकः पीआरई/प्राशि-
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१३०६१८१०४३०३६४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.