शिक्षक सक्षमीकरण ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ साठी प्रशिक्षणाचीची निवडीबाबत shikshak sakshamikaran selection
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ साठी प्रशिक्षणाचीची निवड करून त्यांना उपस्थित राहणेसाठी आदेशित करणेबाबत.
संदर्भः १. प्रस्तुत कार्यालयाची मान्य टिपणी दि. २६/१२/२०२४
२. स्टार्स व समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२४-२५ करीता मंजूर उपक्रम.
उपरोक्त विषयान्वये, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी प्रशिक्षण आयोजन परिषदेच्या मार्फत करण्यात येत आहे. त्याचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण हे इ.१ ली ते ५ वी तसेच इ.६ वी ते ८ वी आणि इ.९ वी ते १२ वी इयत्तांना शिकविणा-या सर्व शिक्षकासाठी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेसाठी स्वतंत्र असणार आहे. सदर प्रशिक्षणामध्ये पुढील विषयांचा समावेश असेल-राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत शिक्षण) २०२३. राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF), क्षमताधारित मूल्यांकन संकल्पना व कार्यनीती, क्षमताचारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, क्षमताधारित प्रश्ननिर्मिती, उच्च विचारप्रवर्तक प्रश्न (HOT), अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्ननिर्मिती, समग्र प्रगतीपत्रक (HPC)- संकल्पना व स्तरनिहाय स्वरुप, इत्यादी.
तरी, प्रशिक्षणार्थी यांची निवड करतांना प्रशिक्षणातील विषय व इयत्ता स्तर विचारात घ्यावेत तसेच, जिल्हास्तर व तालुका स्तर प्रशिक्षणासाठी पुढील नियोजन सुरु करावे. जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षणांसाठी पुढीलप्रमाणे आर्थिक तरतूद मंजूर आहे. सदर मर्यादेत खर्चाचे नियोजन करावे, सर्व खर्च व देयके वित्तीय नियमानुसार पूर्ण करावे.