भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मानधनात वाढ block level officer mandhan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मानधनात वाढ block level officer mandhan 

वाचा:– १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र: ईएलआर-१०१०/प्र.क्र.२७२/१०, दिनांक २८ जून, २०१०.

२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र: ईएलआर-१०१४/प्र.क्र.२९४/१४/३३, दिनांक २१ मार्च, २०१४.

३) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. २३/आयएनएसटी/२०१५-ईआरएस, दि.०८ जुलै, २०१५.

प्रस्तावना:-

१. महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (Booth Level Officers) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

२. मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची महत्वाची भूमिका आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांव्दारे विशेषतः मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविणे, विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करणे, तसेच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे इ. कामे करण्यात येतात. तसेच छायचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णतः अचूक होण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer) यांना सहाय्य करणे, मतदारांना मतदार चिड्डी (Voter Slip) वाटप करणे व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे इ. कामे ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) करीत असतात. सदर कामे ते त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करीत असल्यामुळे त्यांना त्यासाठी उपरोक्त दिनांक २१ मार्च, २०१४ च्या शासन निर्णयान्वये मंजूर मानधन देण्यात येते. तथापि, भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक ०८ जुलै, २०१५ च्या पत्रान्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना रु.५०००/- ऐवजी रु.६०००/- मानधन देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

सदर शासन निर्णयान्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (Booth Level Officers) सन २०१९-२०२० या वित्तीय वर्षापासून प्रतिवर्षी रु.५०००/- ऐवजी ६०००/- (रु. सहा हजार फक्त) एवढे सुधारीत मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. तसेच मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (Booth Level Officers) यांना त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी आणखी रू. १०००/- वार्षिक मानधन अनुज्ञेय राहील.

३. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च २०१५-निवडणूका १०३-मतदारांच्या याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण (००) (०१) मतदार याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण, १३ कार्यालयीन खर्च, संगणक संकेतांक २०१५००३२ या लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व संबंधित वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.२६२/१९/व्यय-४, दि.०७.०८.२०१९, अनौ.सं.क्र.२०२/१९/सेवा-६, दि. १९.०८.२०१९ व अनौ.सं.क्र.३३१/अर्थोपाय, दि.१३.०९.२०१९ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१९०९२६१३१०११४५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,