शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत servant work evaluation report

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत servant work evaluation report 

शासन परिपत्रक

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी याबाबतच्या सूचना शासन परिपत्रक दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

२. महापारमध्ये अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विशेषतः WebVPN ही सुविधा काही अधिकारी/कर्मचारी (Users of MahaPAR) यांना उपलब्ध झाली नसल्याने सन २०२३-२४ या वर्षाचे गोपनीय अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी १ महिन्याची म्हणजेच दिनांक ३१ जानेवारी, २०२५ पर्यंतची मुदतवाढ दिनांक २६ नोव्हेंबर, २०२४ च्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आली होती.

३. तथापि, MahaPAR या संकेतस्थळावर जाण्यासाठी WebVPN सुविधेचा वापर कसा करावा याबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे सन २०२३-२४ या वर्षाचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आणखी २ महिन्यांची म्हणजेच दिनांक ३१.०३.२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर मुदतवाढ अंतिम असेल. महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन २०२४-२५ या वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक १ एप्रिल, २०२५ रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येतील.

४. वर नमूद केलेल्या वेळेत ही सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांची राहील.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२५०१३११४४५३७१९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Join Now