दुष्काळसदृश्य भागातील इ.१०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती बाबत परिपत्रक ssc hsc pariksha shulka pratipurti
सन २०२३-२०२४ मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य भागातील इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करणेकरीता उर्वरित विद्यार्थ्यांचे बैंक खाते व अनुषंगिक माहिती सुधारित करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल दि. ३ फेब्रुवारी ते दि. १४ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत उपलब्ध असल्याबाबत,
संदर्भ – १. शासन निर्णय क्र.एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दि.३१/१०/२०२३ व दि.१०/११/२०२३.
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.४७/एसडी-५, दि.१ ऑगस्ट, २०१९ व
शुध्दीपत्रक दि.३/२/२०२०
३. राज्य मंडळाचे पत्र क्र.रा.मं./ सन २०२३दुष्काळ ख. हं/ पुणे ४, दि. २७/०३/२०२४
४. राज्य मंडळाचे पत्र क्र.रा.नं./ सन २०२३दुष्काळ ख. हं./४३२१ पुणे ४, दि. २९/१०/२०२४
५. राज्य मंडळाचे पत्र क्र.रा.मं./ सन २०२३दुष्काळ ख. हं./४४६४ पुणे ४, दि. १३/११/२०२४
६. राज्य मंडळाचे पत्र क्र.रा.मं./सन २०२३दुष्काळ ख. हं./४७३० पुणे ४, दि.१०/१२/२०२४
७. राज्य मंडळाचे पत्र क्र.रा.मं./सन २०२३दुष्काळ ख. हं./५०२२ पुणे ४, दि. ३०/१२/२०२४
८. राज्य मंडळाचे पत्र क्र. रा.मं./ सन २०२३ दुष्काळ ख. हं./१७९ पुणे ४, दि. १५/०१/२०२५
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दि.१/८/२०१९ व शुध्दीपत्रक दि.३/२/२०२० अनुसार, सन २०२३-२४ मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य भागातील इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परतावा विद्यार्थी / पालकांच्या “आधार संलग्न बैंक खात्यात” सन २०२३-२०२४ व सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात पहिला लॉट दि. २८ मार्च, २०२४ रोजी, दुसरा लॉट दि. १० जुलै, २०२४ रोजी, तिसरा लॉट दि. ५ ऑगस्ट, २०२४ रोजी, चौथा लॉट दि. २७ ऑगस्ट, २०२४ रोजी, पाचवा लॉट दि. २५ नोव्हेंबर, २०२४ रोजी, सहावा लॉट दि. ११ नोव्हेंबर, २०२४ रोजी, सातवा लॉट दि. १६ ऑक्टोबर, २०२४ रोजी तसेच आठवा लॉट दि. १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी असे एकूण १ ते ८ लॉटद्वारे आतापर्यंत एकूण ३,४०,१६५ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा देण्यात आलेला आहे.
परीक्षा शुल्काचा परतावा करण्याकरीता पात्र विदयार्थ्यांचे आधार लिंक असलेले बैंक खाते तपशील, विदयार्थ्याचे आधार कार्ड इ. माहितीमध्ये दुरुस्ती सुधारित माहिती सादर करण्याकरीता ऑनलाईन पोर्टल दि. ०३/०२/२०२५ ते दि. १४/०२/२०२५ या कालावधीत सुरू करण्यात येत आहे.
सन २०२३-२४ मध्ये जाहीर झालेल्या दुष्कसळसदृश्य भागातील इ. १० वी व इ. १२ वीच्या परीक्षा शुल्क परतावा प्रलंबित असलेल्या एकूण २,५८,८९९ विदयार्थ्यांचे बैंक खाते क्रमांक तपशील व इतर माहिती दुरूस्त/सुधारित करण्याकरीता आपल्या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील संबंधीत माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविदयालयांना अवगत करावे.