(इ.१०वी) मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत secondary school certificate exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(इ.१०वी) मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत secondary school certificate exam 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत…

संदर्भ :- शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१७/(११८/१७)/एस.डी-६, दिनांक १६ ऑक्टोबर, २०१८.

उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरुन या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात येत की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२५ परीक्षेस आपल्या माध्यमिक शाळेतुन प्रविष्ठ होणाऱ्या दिव्यांग विद्याथ्यांचे सवलत मिळण्याबाबतचे प्रस्ताव मंडळाच्या निर्धारित प्रपत्रासह त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रस्ताव बा कार्यालयास सादर करताना खालील बाबींची पुर्तता करणे आवश्यक आहे.

१) मुख्याध्यापकांचे दिव्यांग सवलत मिळण्याबाबत स्पष्ट शिफारस पत्र आवश्यक आहे. सदर शिफारस पत्रामध्ये दिव्यांग विदयाथ्यांना कोणत्या प्रकारची सवलत हवी आहे याचा स्पष्टपणे उल्लेख असणे आवश्यक आहे.

२) दिव्यांग विद्यार्थ्यांस महाराष्ट्र शासनाने दिलेले अधिकृत प्रमाणपत्राची प्रमाणित छायाप्रत जोडण्यात यावी ३) मंडळाच्या विहित दिव्यांग फॉर्म प्रपत्रावर जिल्हा शल्यचिकित्सक यांची शिक्का व स्वाक्षरी आवश्यक

आहे. (मंडळाचे विहित दिव्यांग फॉर्म प्रपत्र या पत्रासोबत सोबत जोडलेले आहे)

४) जर एखादया दिव्यांग विदयार्थ्यांकडे स्वावलंबन प्रमाणपत्र (Unique Disability ID Card) असेल तर अशा दिव्यांग विदयाध्यर्थ्यांकरिता जिल्हा शल्यचिकित्सक यांची प्रतिस्वाक्षरी असलेले विहित नमुन्यातील फॉर्म प्रपत्राची आवश्यकता नाही,

५) सदर विद्याव्याचा दिव्यांग भागासह काढलेला अद्ययावत फोटो प्रमाणपत्रावर लावून त्यावर जिल्हा शल्य चिकित्सक यांचा शिक्का घेण्यात यावा,

६) ज्या विद्याध्यर्थ्यांनी मंडळाच्या विहित नमुन्यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केली असतील अशा दिव्यांग विद्याध्यर्थ्यांचा ऑनलाईन आवेदनपत्र भरताना दिव्यांग कोड न चुकता भरण्यात यावा अथवा तशी दुरुस्ती प्रि-लिस्टमध्ये दर्शविण्यात यावी. (दिव्यांग प्रकारनिहाय कोडची यादी सोबत जोडलेली आहे)

प्रति,

७) इ. १० वी मार्च २०२५ परीक्षेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतलेले विषय व माध्यम याबाबतचा तपशील जोडणे आवश्यक आहे. (विषय योजना तपशील जोडणे आवश्यक आहे)

८) दिव्यांग विद्यार्थ्यास लेखनिकाची आवश्यकता असल्यास लेखनिक हा त्या शाळेतील इ. ९ वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी विद्यार्थीनी असावा. सदर प्रस्तावासोबत मुख्याध्यापकाचा लेखनिक मिळण्याबाबत स्पष्ट उल्लेख असावा, दिव्यांग विद्याथी व त्याचा पालकाचा लेखनिक मिळण्याच्कबत विनंती अर्ज, संबंधित लेखनिक विद्यार्थाचा फोटो लावलेले बोनाफाईड प्रमाणपत्र, लेखनिक व त्यांच्या पालकांचे संमतीपत्र सादर करावे. जर एखादया दिव्यांग विद्यार्थाने अंकगणित (७६) हा विषय घेतलेला असल्यास फक्त त्या विषयाकरिता इ. ६ वी मधील लेखनिक घेणे अनिवार्य आहे, याची दक्षता संबंधीत

मुख्याध्यापकांनी घ्यावी. ९) परीक्षेच्या ऐनवेळी हाताला दुखापत/ अपघात झालेल्या विद्यार्थ्यास लेखनिक सवलत हवी असल्यास त्याने नजिकच्या शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय लेखनिकाची सवलत दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. (उदा. बोट हात पाय फैक्चर होणे)

उपरोक्त प्रमाणे सदर कागदपत्राची पुर्तता करुन, संबंधीत विद्याथ्यर्थ्यांस आवश्यक सवलतीचा स्पष्ट उल्लेख शाळेच्या शिफारस पत्रामध्ये करून सदर प्रस्ताव या कार्यालयाकडे दिनांक ३०/०९/२०२४ पर्यंत समक्ष सादर करावे. सदर दिव्यांग सवलत मिळण्याबाबत प्रस्ताव संबंधीत माध्यमिक शाळेने या कार्यालयास सादर न केल्यामुळे विद्याथ्यांच्या होणाऱ्या सभांव्य शैक्षणिक नुकसानीस संबंधीत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी.