एसईबीसी (SEBC) आरक्षण प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना SEBC reservation 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एसईबीसी (SEBC) आरक्षण प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना SEBC reservation 

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

संदर्भ-१. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-३ दि.११ मार्च २०२४.

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र.बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-३ दि.१५ मार्च २०२४.

शासन शुद्धीपत्रक-

संदर्भीय क्र. १ येथील शासन परिपत्रकातील परिशिष्ट-अ तसेच संदर्भीय क्र. २ येथील शासन शुद्धीपत्रक क्र. बीसीसी-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-३ दिनांक १५ मार्च २०२४ रद्द करण्यात येत असून, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गाकरीता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारीत परिशिष्ट-अ व परिशिष्ट-ब स्वतंत्र पृष्ठांवर विहित करण्यात येत आहे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०६२८१७५११०३००७ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Leave a Comment