२०२४-२५ निधी वितरण ३४ – शिष्यवृत्ती/विद्यावेतन scolarship nidhi vitaran
संदर्भ :-
१) शिक्षण संचालक, योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.०५.०७.२०२४, दि.३१.१२.२०२४, दि.०२.०१.२०२५ व दि.१७.०२.२०२५ रोजीचे पत्र.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. निधीवि-२०२४/प्र.क्र.३२/एसडी-५. दि.०६.०८.२०२४, दि.०९.०१.२०२५ व दि.२८.०१.२०२५.
३) वित्त विभागाचे क्र. अर्थसं २०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३,दि.२५.०७.२०२४ व दि.१२.०२.२०२५ चे परिपत्रक
प्रस्तावना :-
शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणा-या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांबाबतचा सन २०२४-२५ चा मंजूर निधी बी. डी. एस प्रणालीवर उपलब्ध करुन देण्याबाबत शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भ क्र.१ येथील दि.०५.०७.२०२४ रोजीच्या पत्रान्वये विनंती केली होती. त्याअनुषंगाने वित्त विभागाच्या दि.२५.०७.२०२४ रोजीच्या परिपत्रकान्वये निधी वितरणासाठी उद्दिष्टनिहाय खर्चासाठी घालून दिलेल्या मर्यादेनुसार दि.०६.०८.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३० टक्के च्या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला आहे. दि.०९.०१.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये ८० टक्केच्या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच दि.२८.०१.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये ९० टक्केच्या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला आहे सद्यस्थितीत ३४- शिष्यवृत्ती /विद्यावेतन या उद्दिष्टाखाली मंजूर निधीच्या १०० टक्के इतक्या प्रमाणात निधी वितरणासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे.
त्यानुषंगाने राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्याकरीता वित्त विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण मंजूर केलेल्या निधीच्या १०० टक्केच्या प्रमाणात ३४-शिष्यवृत्ती / विद्यावेतन या उद्दिष्टाखाली निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :-
राज्यात गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी विविध योजना कार्यन्वित आहेत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित तरतूदीमधून वित्त विभागाने वितरणासाठी उपलब्ध केल्यानुसार अर्थसंकल्पित मंजूर तरतुदीच्या १०० टक्के च्या प्रमाणात निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
४. वरील बाबींवर होणारा खर्च उपरोक्त नमूद केलेल्या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.
५. सदर निधी वितरीत करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी (लेखा), शिक्षण संचालनालय योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणाऱ्या निधीकरिता आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. याबाबतीत वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्त्वे / शासन निर्णय / शासन परिपत्रक यामधील सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२२४१२२६२४४४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.