सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत sanchmanyata samayojan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत sanchmanyata samayojan

संदर्भ:-१

. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (वच्याशी नियमावली १९८१

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र.२०१७/(२२/१०/२ दि.८.१०,२०१७

३. मा. अपर सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पक्रन २०१८/ प्र.क्र.२९२/टिएनटी-दिनांक १५ नोव्हेंबर, २०१८

४. मा. आयुक्त शिक्षण, म.रा. पूणे यांचे कार्यालयातील कि.मी. दिनांक १०.१२.२०२४ मधील सूचना

५. मा. विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांची व्हि.मी. दि.११.१२.२०२४ मधील सूचना

६. संच मान्यता सन २०२३-२४

७. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. एमएसएन-२०१४/प्र.क्र.२२/१०/टीएनटी-२

दिनांक १५.३.२०२४

८. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./ निपछर्स/ शिक्षण/मावि ६/२०२४-२०/१३१८ दिनांक १२.१२.२०२४

९. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./ जिपठसं/शिक्षण/मावि ६/२०२४-२५/१७२५१७३१

दिनांक २३.१२.२०२४

१०. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. / जिपछसं/शिक्षण/मावि ६/२०२४-२५/४८६ दिनांक १५

उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भिय पत्रानुसार कळवण्यात येते की, सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या सहशिक्षकांचे संदर्भीय शासन निर्णय दिनांक १५.३.२०२४ नुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रार्वामक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती विहित केरलेली आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक ४ अन्वये मा. आयुक्त शिक्षण यांच्या व्हो. सी. मधील सूचनेनुसार या कार्यालयाने अनुदानित व अशंतः अनुदानित शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे संस्था अंतर्गत समायोजन करुन तदनंतर अतिरिक्त ठरलेल्या कर्मचान्याची नावे दिनांक १९.१२.२०२८ व २०.१२.२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबीरस्थळी सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.

शाळा/संस्थेकडून संस्था अंतर्गत समायोजन करुन प्राप्त झालेल्या यादीवर अतिरिक्त ठरलेल्या कर्मचान्यांचा आक्षेप मार्गावण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकत्रित यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तदनंतर संदर्भीय पत्र क्रमांक ९ व १० अन्वये शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचान्यांची माहिती सादर न केल्यास संबंधित अतिरिक्त कर्मचान्यांचे वेतन अदा करण्याची जवाबदारी संबंधित व्यवस्थानाची राहील असे सूचित करण्यात आले होते.

(२)

शाळा/व्यवस्थापनाकडून प्राप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सन २०२३-२४ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची अंतिम यादी या सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर अतिम यादीबाबत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आक्षेप असल्यास त्याबाबत आवश्यक त्या लेखी पुराव्यासह शनिवार दिनांक १८.१.२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयास सादर करावीत. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर दिनांक २०.१.२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयात सुनावणी घेवून आक्षेपांचे निराकरण करण्यात येईल. विहित मुदतीत आक्षेप प्राप्त न झाल्यास नियमानुसार समायोजनाची कार्यवाही करण्यात येईल. येणवेळी प्राप्त होणाऱ्या आक्षेपाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सन २०२३-२४ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समुपदेशनाद्वारे समायोजनाची प्रक्रिया दिनांक २० जानेवारी, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी समुपदेशाने समायोजनासाठी अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच समायोजनासाठी रिक्त पदे सादर केलेल्या मुख्याध्यापक/लिपीक यांनी शिबिरस्थळी विहित वेळेत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

आपल्या शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकास आपल्या स्तरावरुन सूचना देवून आपण स्वतः समायोजन स्थळी

अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह उपस्थित रहावे,

रिक्त व अतिरिक्त पदे असलेल्या शाळांतील मुख्याध्यापक/कनिष्ठ लिपीक व अतिरिक्त कर्मचारी समायोजन प्रक्रियेस अनुपस्थित राहिल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाच्या स्तरावरुन समायोजनाची कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.