सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार अतिरक्ति ठरलेल्या शिक्षक समायोजनाबाबत atirikt shikshak samayojan
संदर्भ –
1. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (संवेच्या शर्ती) नियमावली 1981
2 मा शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पूणे यांचे पत्र क्रमांक अमाशा/माध्य/307/अतिरिक्त शि./ दिनांक 10/06/2016
3 सन 2023-24 ची ऑनलाईन संचमान्यता
4 शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शा.नि.क्रमांक एसएसएन-2017/22/1 टिएनटी 1 दिनांक 04/10/2017
5. समायोजन प्रकिया दिनांक 09/12/2024, 20/12/2024, 30/12/2024
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार सन २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांचे समायोजन संदर्भ क्रमांक ५ नुसार करण्यात आले आहे. सोबत जोडलेल्या यादीतील अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांना यादीत नमुद केलेल्या समायोजित शाळेने हजर करुन घेतलेले नाही. तथापी समायोजन करुन न घेतलेल्या यादीतील शाळेच्या मुख्याध्यापकांनी सन २०२३-२४ ची संचमान्यता, अदयावत बिंदुनामावली गोषवारा, वेतनदेयक, या कार्यालयास सादर केलली रिक्त / अतिरिक्त पदांची माहिती, अतिरिक्त शिक्षिक / शिक्षकेतर कर्मचा-यास का हजर करुन घेत नाही याबाबतचे लेखी म्हणणे व ठोस पुरावे, तसेच सदयस्थितीत बिंदुनामावलीनुसार कोणत्या संवर्गाचे, विषयाचे व गटाचे पद रिक्त आहे त्याबाबतची माहिती इ. माहितीसह दिनांक २०/०१/२०२५ रोजी दुपारी ०१.३० वाजता बी जे हायस्कुल, टेंभी नाका, ठाणे (प) ४००६०१ येथे उपस्थित रहावे. सदर दिनांकास उपस्थित न राहिल्यास संदर्भ क्रमांक ४ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सोबत हजर करुन न घेतलेल्या शिक्षक / शिक्षकेतर कम्रचा-यांची यादी