वरिष्ठ व निवडश्रेणी ही योजना पदोन्नतीशी संलग्न असल्याने पदोन्नती प्रक्रीया दरवर्षी राबविण्याबाबत right to information paripatrak
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ अंतर्गत माहिती मिळणेबाबत.
महोदय,
विषयांकित प्रकरणीचा आपला माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आपले दि.१५.०२.२०२५ रोजीचा अर्ज, या प्राधिकरणास सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१४.०२.२०२५ रोजीच्या पत्रान्वये दि.०५.०३.२०२५ रोजी आपल्या अर्जातील मुद्दा क्र. अ व ब च्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी प्राप्त झालेला आहे. आपल्या अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, आपण विचारलेली माहिती व त्या अनुषंगाने सेवा-३ या कार्यासनाचे अभिप्राय / माहिती खालीलप्रमाणे आहे.
प्रस्तुत प्रकरणी आपणास अपिल दाखल करावयाचे झाल्यास यासंदर्भात आपण श्री.वि.अ. धोत्रे, उप सचिव तथा अपिलीय प्राधिकारी वित्त विभाग/ का.क्र. सेवा-३, दालन क्र. ३२६ ओ, तिसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ यांच्याकडे हे पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत विहीत नमुन्यात माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १९ (१) नुसार अपिल दाखल करु शकता.