RTE 25% मोफत प्रवेश शाळा नोंदणी कशी करावी? प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना right to education
* परिचयः
शाळा नोंदणीसाठी RTE 25% प्रवेश पोर्टलवर आपले स्वागत आहे. पोर्टलवर तुमच्या शाळेची नोंदणी कशी करावी याविषयी मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे आहे.
पोर्टलवर प्रवेश करणे:-
1) तुमचा वेब ब्राउझर उघडा आणि
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या संकेस्थळावर जा.
2) ‘प्रशासन/शाळा लॉगिन” टॅबवर क्लिक करा.
1) युजर आयडी कॉलममध्ये तुमचा शाळा UDISE क्रमांक टाका.
2) पासवर्ड कॉलममध्ये विभागाने दिलेला डीफॉल्ट पासवर्ड एंटर करा.
3) कॅप्चा सत्यापन पूर्ण करा.
4) “लॉगिन” बटणावर क्लिक करा.
5) “पासवर्ड रीसेट करा” स्क्रीन दिसेल. तुमचा पासवर्ड रीसेट करा आणि सबमिट करा.
6) पासवर्डची लांबी ८ अक्षरांची असावी आणि त्यात अप्परकेस, लोअरकेस आणि स्पेशल कॅरेक्टर इ.
7) तुमचा UDISE नंबर आणि नवीन सेट केलेला पासवर्ड वापरून पुन्हा लॉग इन करा.
१) कृपया तपशील तपासा आणि काही दुरुस्त्या असल्यास, शाळेचे तपशील आणि मुख्याध्यापक माहिती (मुख्याध्यापकाचे नाव, मुख्याध्यापक मोबाईल क्रमांक इ.) अद्ययावत करा.
२) बदल केल्यानंतर “सेव्ह आणि प्रोसीड” वर क्लिक करा.
* पत्ताः
१) कृपया तुमच्या शाळेच्या परवानगी पत्रानुसार तुमच्या शाळेचा पत्ता प्रविष्ट करा.
२) कृपया तुमच्या शाळेच्या दर्शनी ठिकाणी बलून निश्चित करा.
३) बलून सेट केलेल्या स्थानानुसार अक्षांश आणि रेखांश आपल्या शाळेचा गुगल पत्ता निश्चित होईल. सदरचा गुगल पत्ता अचूक असल्याची खात्री मुख्याध्यापक यांनी करावी.
४) कृपया तुमचे सेट केलेले स्थान योग्य असल्यास ‘होय’ निवडा किंवा नसल्यास ‘नाही’ निवडा.
शाळेचा प्रवेशस्तर निश्चित करावा.
प्रवेश स्तरानुसार विद्यार्थांचे किमान व कमाल वय स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
प्रवेश स्तरावरील कोणत्याही बदलांसाठी गट शिक्षणाधिकारी यांचेशी (BEO) संपर्क साधावा
* रिक्त पदेः
शाळेच्या सरल पोर्टल वरून मागील ३ वर्षाची सरासरी वरून शाळेच्या प्रवेश स्तरावरील RTE क्षमता निश्चित होईल.
RTE क्षमतामध्ये काही बदल करावयचा असेल तर सदर शाळांनी गट शिक्षणाधिकारी यांचेशी (BEO) संपर्क साधावा
BEO कडे फॉरवर्ड कराः
* शाळेनी भरलेले सर्व तपशील या स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील. सदरची माहिती अचूक 3 खात्री मुख्याधापक यांनी करावी. 3/4
* सर्व माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर पुनर्विलोकन आणि मंजुरीसाठी अर्ज गट शिक्षणाधिकारी यांचेकडे सबमिट करण्यासाठी “Forward to BEO” बटणावर क्लिक करा.
शाळेच्या सरल पोर्टल वरून मागील ३ वर्षाची सरासरी वरून शाळेच्या प्रवेश स्तरावरील RTE क्षमता निश्चित होईल.
RTE क्षमतामध्ये काही बदल करावयचा असेल तर सदर शाळांनी गट शिक्षणाधिकारी यांचेशी (BEO) संपर्क साधावा
BEO कडे फॉरवर्ड कराः
* शाळेनी भरलेले सर्व तपशील या स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील. सदरची माहिती अचूक असल्याची खात्री मुख्याधापक यांनी करावी.
* सर्व माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर पुनर्विलोकन आणि मंजुरीसाठी अर्ज गट शिक्षणाधिकारी यांचेकडे सबमिट करण्यासाठी “Forward to BEO” बटणावर क्लिक करा.
* महत्त्वाच्या सूचनाः-
१) प्रविष्ट केलेली सर्व माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करा.
२) कोणत्याही RTE तपशील बदलांसाठी गट शिक्षणाधिकारी यांचेशी (BEO) संपर्क साधावा
३) एकदा गट शिक्षणाधिकारी कडे माहिती पाठविल्यानंतर त्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.