राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये 26 जानेवारी2025 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमासह साजरा करणे बाबत republic day celebration with activities

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये 26 जानेवारी2025 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमासह साजरा करणे बाबत republic day celebration with activities

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत…

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/ एस.डी.-४, मंत्रालय, मुंबई

दिनांक : ३१ डिसेंबर, २०२४

शासन परिपत्रक खालील प्रमाणे :-

भारताची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आले आहे. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

शासन निर्णय येथे पहा Click Here 

२. सदर दिवस हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपल्या देशाची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने शाळांकडून प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रजासत्ताक दिनांकानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत दरवर्षी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येतात. सदर परिपत्रकातील सूचनांचे प्राथम्याने पालन करावे. सदर सूचनांच्या पालनासह दिनांक २६ जानेवारी, २०२५ पासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी खालील उपक्रम राबवावेत. यासाठी प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ व प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यावा.

१) प्रभात फेरी

 शाळेमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन, देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी.

२) भाषण स्पर्धा :

विद्यार्थ्यांकरिता स्वातंत्र्य सेनानी, देशभक्ती, लोकशाही इत्यादी विषयांवर भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करावी.

३) कविता स्पर्धा :

विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करावे.

४) नृत्य स्पर्धा :

विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी.

५) चित्रकला स्पर्धा :

विद्यार्थ्यांकरिता देशभक्तीपर विषयांवर चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करावी.

६) निबंध स्पर्धा :

विद्यार्थ्यांकरिता देशभक्ती, स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयांवर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करावी.

७) खेळ :

विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावेत.

८) प्रदर्शनी :

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, चित्रकला इत्यादींची प्रदर्शनी आयोजित करावी.

उपरोक्त कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करावा.

३. सदर परिपत्रकातील सूचनांप्रमाणे शाळांकडून प्रत्येक वर्षीचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल यासंदर्भात संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), शिक्षण निरीक्षक यांनी काळजी घ्यावी.

४. वरील परिच्छेद क्र. २ मधील सुचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करतील याबाबतची दक्षता आयुक्त (शिक्षण), यांनी घ्यावी आणि त्याकरिता आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित कराव्यात.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४१२३११६००५४५३२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( तुषार महाजन )

उप सचिव, महाराष्ट्र शासन