बदली व्यक्तीव्दारे (प्रॉक्सी) मतदान; प्रॉक्सी मत म्हणजे काय? proxy vote
सेनादलातील वर्गीकृत मतदारांना त्यांनी नियुक्त केलेल्या बदली व्यक्तींमार्फत मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
याकरीता CSV यांच्या घराचा पत्ता, ज्या मतदान क्षेत्रात येतो, त्या केंद्रावर बदली व्यक्तीद्वारे मतदान करता येईल.
मतदार नोंदवही नमुना 17A मध्ये दुस-या रकान्यात CSV यादीतील अनुक्रमांक नोंद करण्यात यावा त्यापुढे PV अशी नोंद घ्यावी. उदा. CSV यादीमध्ये 5 अनुक्रमांक असेल तर मतदार नोंदवहीत 5(PV) अशी नोंद करण्यात यावी.
असा बदली मतदार अन्य कोणताही मतदार ज्या पद्धतीने मतदान करील, त्याच पद्धतीने मतदान करील.
अशा बदली (प्रॉक्सी) मतदारांच्या बाबतीत पक्क्या शाईची खूण ही नियम-३७ नुसार डाव्या
हाताच्या मधल्या बोटावर करण्यात येईल, असा बदली मतदार त्याचे स्वतःचे नाव मतदार म्हणून त्या मतदारसंघात नोंदविलेले असल्यास त्याच मतदान केंद्रावर स्वतःचे मत देखील देऊ शकेल.
अशा वर्गीकृत सेनादलातील मतदारांची यादी ही आपल्या मतदान केंद्राच्या मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा भाग म्हणून समजण्यात येईल.