‘पीएम किसान’ची फाइल डाऊनलोड करताच खात्यातून २ कोटी गायब अमरावती येथील प्रकार; पोलिसांकडून तपास सुरू pm kisan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘पीएम किसान’ची फाइल डाऊनलोड करताच खात्यातून २ कोटी गायब अमरावती येथील प्रकार; पोलिसांकडून तपास सुरू pm kisan

अमरावती : ‘पीएम किसान डॉट एपीके’ ही फाइल डाऊनलोड करताच एका ३६ वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून तब्बल २ कोटी ४८ लाख १५६ रुपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अविनाश रोतळे (वय ३६) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दत्त मंदिर, कुंभारवाडा परिसरात राहणारे अविनाश रोतळे हे एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आहेत. त्यांना या ग्रुपवर ‘पीएम किसान डॉट एपीके’ ही फाइल प्राप्त झाली होती. पीएम किसान योजनेशी संबंधित माहिती किंवा इतर बार्बीशी निगडित हे अॅप असावे, असा समज रोतळे यांचा झाला. त्यातूनच त्यांनी फाइलवर क्लिक करून ती आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून घेतली. त्यानंतर हे अॅप त्यांनी रीतसर इन्स्टॉल देखील केले. त्यानंतर काही वेळातच भामट्यांनी मोबाइलवर ताबा मिळवीत त्यांच्या खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यात वळते केले.

कोणतीही लिंक ओपन करू नका’

‘पीएम किसान डॉट एपीके’ अशा प्रकारच्या कोणत्याही अॅपची लिंक ओपन करू नये, असे आवाहन या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केले आहे. पीएम किसानच्या सर्व प्रकारच्या माहितीसाठी शासनाचे पोर्टल आहे. त्यावरून अपेक्षित माहिती मिळविण्याचा प्रयत्न करावा, असेही विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी सांगितले.