“स्वातंत्र्यवीर सावरकर” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay
चा *र काटक्या जमवून घरटे बांधायचे आणि पिलांसह जगायचे, याला का संसार म्हणतात ? असा संसार तर कावळे चिमण्याही करतात. आपल्याला संसार करायचा आहे, तो आपल्या देशाचा, आपल्या संसाराची मोडतोड होऊन जर पुढे हजारो देशबांधवांचे संसार सुखी होणार असतील, तर आपल्या जीवनाचे सार्थक होईल.’
असे उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगात भेटायला आलेल्या त्यांच्या पत्नीशी बोलताना काढले होते.
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी झाला. भगूर आणि नाशिकला मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण घेऊन पुण्याच्या फर्गसन कॉलेजात ते दाखल झाले.
पुण्यास येण्यापूर्वी त्यांनी देशभक्त तरुणांचा ‘मित्रमेळा’ स्थापन केला होता. याच मित्रमेळ्याचं पुढं ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेत रूपांतर झालं.
छत्रपती शिवाजीमहाराज व लोकमान्य टिळक ही सावरकरांची दोन प्रेरणास्थानं होती. त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन सावरकरांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली होती.
सावरकर अतिशय बुद्धिमान आणि स्वाभिमानी विद्यार्थी होते. आपला देश स्वतंत्र वही पारयात खितपत पडला आहे, याचा त्यांना फार संताप येई. ते देशभक्तिपर कविता करत, तेजस्वी लेख लिहीत आणि प्रभावी भाषणं देत आपल्या मित्रमंडळींना स्वातंत्र्यलयाची प्रेरणा देत.
पुण्याला फर्गसन कॉलेजात असताना सावरकरांनी स्वदेशीचा प्रचार केला. १९०५ च्या नवरात्रात त्यांनी एका सायंकाळी मित्रमंडळी जमवल्ली. एका बैलगाडीत परदेशी काप १९०५ च्या कोण रखून त्याची मिरवणूक काढली व शेवटी या परदेशी कपड्यांची होळी पेटवली यांचा मोवा झाज सत्लेविरुद्ध एक जळजळीत भाषण केलं.
ही वार्ता कळल्यावर पुणे शहरात मोठी खळबळ उडाली. कॉलेजच्या प्राचार्यांनी सावरकरांवर शिस्तभंगाची कारवाई केली.
देशाचं स्वातंत्र्य, त्यासाठी गुप्त संघटना बांधणं, शस्त्रास्त्रं मिळवणं या गोष्टींचा सावरकरांना अखंड ध्यास होता, पण हे जमावं कसं ? इच्छा असली, की मार्ग सापडतो. श्यामजी कृष्ण वर्मा या इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय क्रांतिकारकानं होतकरू देशभक्त तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती ठेवली होती. बी. ए. झाल्यावर ही शिष्यवृत्ती मिळवून सावरकर १९०६ साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत असतानाच तेथील भारतीय विद्यार्थ्यांची संघटना करून सशस्त्र क्रांतीची तयारी करायची, अशी त्यांची योजना होती.
पाच वर्षं इंग्लंडमध्ये राहून सावरकर वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले; पण त्यांना परीक्षेतील यशापेक्षा तळमळ होती भारताच्या स्वातंत्र्याची. त्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये गुप्त संघटना उभारली. शिवजयंती उत्सव, गुरू गोविंदसिंग जयंती, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा
सुवर्णमहोत्सव असे प्रेरणादायी कार्यक्रम त्यांनी लंडनमध्ये घडवून आणले. १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा इतिहास आणि इटलीचा स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी याचं चरित्र त्यांनी लिहिलं; परंतु स्वातंत्र्य प्रेरणेला आवाहन करणारी ही दोन्ही पुस्तकं सरकारनं जप्त
केली.
बाँब बनवण्याची माहिती देणारी पुस्तिका आणि पिस्तुलं मिळवून ती सावरकरांनी भारतातील क्रांतिकारकांना गुप्तपणं पाठवली.
सावरकरांचा इंग्लंडमधील तरुण सहकारी मदनलाल धिंग्रा यानं कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडून त्यास ठार केलं. याच सुमारास नाशिक येथे अनंत कान्हेरे यानं सावरकरांनी पाठवलेल्या पिस्तुलानं कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. या सर्व घटनांचे सूत्रधार सावरकर आहेत, हे सरकारच्या लवकरच लक्षात आलं. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली.
सरकारच्या हाती सापडू नये, म्हणून सावरकर काही काळ पॅरिसला जाऊन राहिले. १३ मार्च १९१० रोजी पॅरिसहून निघून लंडनला येताच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून खटला भरण्यासाठी, त्यांची एका बोटीनं कडक बंदोबस्तात भारताकडं रवानगी केली.
बोट फ्रान्समधील मार्सेल्स बंदराजवळ असताना सावरकर आगबोटीच्या स्वच्छतागृहातून उडी टाकून जवळच असलेल्या किनाऱ्याकडं झपाट्यानं पोहत गेले; परंतु पोलिसांना चुकवणं त्यांना शक्य झालं नाही. ब्रिटिश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं व भारतात आणलं. भारतात खास न्यायालयापुढं त्यांच्यावर दोन खटले चालवण्यात आले व त्यांना एकूण ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली. या शिक्षेसंबंधी सावरकर म्हणाले,
‘पन्नास वर्ष इंग्रजांचं राज्य तरी हिंदुस्थानात टिकणार आहे काय ?’
जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी सावरकरांना अंदमानला नेण्यात आलं. तेथील तुरुंगाच्या एका कोठडीत त्यांना डांबलं. सावरकर तिथं दहा वर्ष होते. या काळात त्यांचा अनन्वित छळ झाला. ‘माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसांचं थरारक शब्दचित्र रेखाटलं आहे.
अंदमानातून १९२१ साली सावरकरांना येरवड्याच्या तुरुंगात हालवण्यात आलं. पुढं
सरकारनं त्यांना रत्नागिरीस नेऊन स्थानबद्ध केलं. रत्नागिरी सोडून त्यांनी कोठेही जायचं नाही, राजकारणात भाग घ्यायचा नाही, अशी बंधनं त्यांच्यावर घालण्यात आली. पुढं १९३७ साली प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. मुंबई प्रांतात राष्ट्रीय सभेचं सरकार
अधिकारावर आलं. त्याच वर्षी सावरकरांची बिनशर्त मुक्तता करण्यात आली.
रत्नागिरीतील त्यांच्या स्थानबद्धतेच्या काळातही सावरकर स्वस्थ बसले नव्हते. या काळात त्यांनी तिथं समाजसुधारणेचं बरंच काम केलं. जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सहभोजन, भाषाशुद्धी अशा अनेक सामाजिक चळवळी केल्या. सावरकर एक थोर साहित्यिक होते. त्यांनी शेकडो लेख लिहिले, कविता केल्या, नाटकं लिहिली, भाषणं दिली व समाजाला जागं केलं. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणून १९३८ साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं. अंधश्रद्धेला त्यांचा विरोध होता. विज्ञानावर त्यांची अपार निष्ठा होती. विज्ञान हे अखिल मानवाच्या समृद्धीसाठी व विकासासाठी आहे, अशी त्यांची धारणा होती.
स्वातंत्र्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या स्वातंत्र्यवीराला स्वतंत्र भारत पाहण्याचं आणि स्वातंत्र्यात जगण्याचं महद्भाग्य लाभलं. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी सावरकरांची प्राणज्योत मालवली.