जनरल रजिस्टर मध्ये जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठी अर्ज pdf change name caste birthdate application
सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली
जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत
माध्यमिक शाळा संहिता नियम २६.४ नुसार सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नांव आडनाव, जात-पोटजात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडुन किंवा त्याच्या वतीने (पालकांकडून) आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे. त्याच्या किंवा त्याच्या वतीने केलेल्या अजर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
विद्यार्थ्याचे नाव जात व जन्मदिनांक दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज pdf
जन्मदिनाक बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
विद्यार्थ्याचे नाव जात व जन्मदिनांक दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
२. जन्म नोंदवहीतील प्रमाणित उतारा ३. लस टोचणी प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत
४. खिश्चनांच्या बाबतीत बाप्तिस्मा प्रमाणपत्राची प्रत
विद्यार्थ्याचे नाव जात व जन्मदिनांक दुरुस्तीसाठी शासन माहितीपत्रक
५. विद्यार्थ्याच्या ख-या जन्मतारखेबाबत वृतिधारी दंडाधिका-यासमोर विद्यार्थ्याच्या आईवडिलानी
किवा पालकाने केलेले शपथपत्र
६. नोंदवहीतील उतारा (जनरलरजिस्टर) प्रमाणित प्रत .
नाव व आडनावातील बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना २ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक)
यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. दत्तक विधानामुळे बदल असलेस त्याबाबत दत्तक पत्राची प्रमाणित केलेली प्रत
३. विवाहामुळे बदल झाला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
४ . आई वडीलानी (पालक) यानी वृत्तिधारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञाप्रत
५. महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूची
६. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर उतारा) प्रमाणित प्रत
जातीत व पोटजातीत बदल बदल करणे बाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे.
१. माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना ३ विहित नमुन्यातील अर्ज (मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी.)
२. मानवसेवा दंडाधिकारी किवा समाजकल्याण अधिकारी)
जातीचा दाखला (जिल्हादंडाधिकारी किंवा त्यानी प्रधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारी,
३.
आईवडीलानी (पालक) यानी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञाप्रत
४. नोंदवहीतील उतारा (जनरल रजिस्टर) प्रमाणित प्रत.