पदवीधर पदावनत पस्ताव;पदवीधर शिक्षकांचे पदावनती करणे अथवा पदवीधर शिक्षक पदाचा विषय बदलून घेणेबाबत padvidhar shikshak padavnati 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदवीधर पदावनत पस्ताव;पदवीधर शिक्षकांचे पदावनती करणे अथवा पदवीधर शिक्षक पदाचा विषय बदलून घेणेबाबत padvidhar shikshak padavnati 

पदवीधर शिक्षक (विषय-समाजशास्त्र) या पदावरील शिक्षकांचे पदावनती करणे अथवा पदवीधर शिक्षक पदाचा विषय बदलून घेणेबाबत….

संदर्भ:- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक- पीटीआर १११३/ (०१/२०१३) एस.एम.-४ दिनांक १३/१२/२०१३

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक- एसएसएन २०१५/प्रक्र १६/१५/टीएनटी-२ दिनांक २८/०८/२०१५

३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक- एसएसएन २०१५/प्रक्र-१६/१५/टीएनटी-२ दिनांक ०८/०१/२०१६

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक- एसएसएन २०१५/प्रक्र- १६/१५/टीएनटी- २ दिनांक १५/०३/२०२४

५. संच मान्यता- २०२२-२३

६. मा. शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचेकडील पत्र जा.क्र. प्राशिस/टे- ३०१/२०२४/४८९४ दिनांक १६/७/२०२४

७. मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सातारा यांचेकडील दिनांक २२/०७/२०२४ रोजीच्या सुचना

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार संदर्भ क्रमांक १ ते ४ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील शिक्षक पदांच्या निश्चितीचे निकष विहित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी वर्गासाठी मंजूर होत असलेल्या पदवीधर शिक्षक पदांमध्ये पहिले पद हे विज्ञान गणित, दुसरे पद हे भाषा व तिसरे पदे सामाजिक शास्त्र या विषयाचे मंजूर असते.

आज रोजी ज्या ठिकाणी दोन पदे मंजूर आहेत अशा शाळेत एक पद विज्ञान गणितासाठी व एक पद भाषेसाठी साठी देणे क्रमप्राप्त आहे. सध्या मंजूर असलेल्या विज्ञान गणित पदवीधर पदावर सामाजिक शास्व विषयाचे पदवीधर शिक्षक पद कार्यरत आहेत. त्यामुळे समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर पद त्या शाळेवर अतिरिक्त ठरत आहे. सदरचे पद अतिरिक्त ठरत असल्यामुळे पदवीधर शिक्षक (विषय समाजशास्त्र) या पदावर अतिरिक्त झालेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन रिक्त पदी करणे आवश्यक आहे. दि. ३१/०५/२०२४ रोजीच्या स्थितीनुसार सातारा जिल्हा परिषदेकडे प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) ची पदे अतिरिक्त ठरत आहेत. ही पदे समायोजित करण्यासाठी पदवीधर शिक्षक (विषय समाजशास्त्र) ची पुरेशी पदे इतर शाळेमध्ये रिक्त नाहीत. त्यामुळे सदर पदवीधर समाजशास्त्र विषयातील कार्यरत असलेल्या पदवीधर शिक्षकांना पदावनत करावे किंवा समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर पदावर करत असलेल्या ज्या शिक्षकांकडे भाषा विषयाची पदवी असेल त्या शिक्षकांना भाषा विषयाच्या पदवीधर पदी रूपांतरीत करावे लागणार आहे. त्याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

. सध्या पदवीधर शिक्षक (विषय समाजशास्त्र) या पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांनी पदवीधर शिक्षक (भाषा

विषय) या पदावर रूपांतरीत होण्यासाठी अथवा पदावनत होण्यासाठीचा प्रस्ताव या कार्यालयाकडे सोबतच्या विहित नमुन्यातील माहितीसह व सोबत दिलेल्या कागदपत्रांसह सादर करण्यात यावा.

२. जे पदवीधर शिक्षक विषय रूपांतरण अथवा पदावनत होण्यास इच्छुक असतील ते पदवीधर शिक्षक प्रस्ताव सादर करतील त्याच पदवीधर शिक्षकांचे विषय रूपांतरण अथवा पदावनतीसाठी विचार करण्यात येईल.

३. पदावनत करण्यात येत असलेल्या शिक्षकांना समुपदेशनासाठी उपशिक्षकांची सर्व रिक्त पदे उपलब्ध असतील. सदर सर्व पदावनत करण्यात येत असलेल्या सर्व शिक्षकांचे जिल्हास्तरावर समुपदेशन प्रक्रीया राबविली जाईल.

४. पदावनात केल्याने ज्यादा वेतन वसूलीसंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ नुसार कार्यवाही केली जाईल. सदर ज्यादा वेतन वसूल करून देण्यात येईल याचे लेखी हमीपत्र १०० रुपयेचे स्टॅम्पपेपरवर संबंधित पदवीधर शिक्षकांना सादर करावे लागेल.

५. प्रस्ताव सादर करताना प्रस्तावाची स्कॅन केलेली सॉफ्ट कॉपी, एक्सेल शीट मध्ये भरलेली माहिती व संपूर्ण कागदपत्र साक्षांकित करून जोडण्याची दक्षता घ्यावी.

६. पदवीधर शिक्षक (विषय समाजशास्त्र) पदावनत प्रस्तावाची माहिती सोबतच्या प्रपत्र अ मध्ये आणि रूपांतरण (पदवी विषय बदलणे) च्या प्रस्तावाची माहिती प्रपत्र व मध्ये सादर करावी.

७. पदवीधर शिक्षक (विषय समाजशास्त्र) पदावनत व पदवीधर शिक्षक रूपांतरण (पदवी विषय बदलणे) असे

दोन वेगळे प्रस्ताव सादर करावेत याची नोंद घ्यावी.

८. सोबतची तपासणी सूची प्रस्तावावर जोडावी त्यावर प्रस्ताव तपासणी करणारे शिक्षण विस्तार अधिकारी यांची स्वाक्षरी करावी.

९. पदावनतचे यापुर्वी प्रस्ताव दिलेले असले तरी नव्याने फेर प्रस्ताव सादर करावेत. पूर्वीचे प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही,

१०. सदरचा प्रस्ताव दिनांक २४/०७/२०२४ पर्यंत तालुका स्तरावर स्वीकारावेत. प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांचो शिक्षण विस्तार अधिकारी यांचेमार्फत तपासणी करावी.

११. तपासणी केलेले व परिपूर्ण असलेले प्रस्ताव दिनांक २६/०७/२०२४ रोजी जिल्हा परिषदेकडे सादर करावेत,

Leave a Comment