2 ऑक्टोबर रोजी जिल्हाअंतर्गत बदलीसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन: प्रशासनास निवेदन offline teacher transfer
जालना जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी वेळोवेळी निवेदन देऊन देखील बदल्या अद्याप पर्यंत करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे त्यामध्येच शिक्षकांनी आता अन्नत्याग आंदोलन करण्याचे ठरवले आहे दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शिक्षकांचे अण्णा त्या आंदोलन होणार आहे या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडून प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलेले आहे. बदली सोबतच इतर अनेक विषयांवर देखील शिक्षकांची मागणी आहे.
दिनांक 15 मार्च 2024 चे जालना जिल्हा परिषद चे जिल्हा अंतर्गत बदली करण्यासंदर्भातील पत्र येथे पहा
*अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची दखल घेत
अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेली निवड वेतन श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी ची सर्व प्रकरणी निकाली काढली आहेत असे कालच शिक्षण विभागातून कळविण्यात आले होते
याबद्दल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी , माननीय शिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी ,तसेच कार्यालयीन अधीक्षक व हे काम पूर्ण करण्यासाठी अविरतपणे काम करणारे श्री पंजाबराव खिल्लारे या सर्वांचे विशेष अभिनंदन
कारण आंदोलन आंदोलनाची नोटीस दिली नसती तर सदरची संचिका अनेक कारणामुळे प्रलंबित राहणार होती आणि नंतर आचारसंहितेच्या लाल फीतीमध्ये अडकणार होती
परंतु प्रशासनाने दखल घेतल्याबद्दल हार्दिक आभार
परंतु उर्वरित प्रश्न जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन हे सुरू राहील
*या आंदोलनाची काही वैशिष्ट्ये आहेत*
१) सदरील आंदोलन हे माझ्या वैयक्तिक रजा खर्च करून व वैयक्तिक पैसे खर्च करून करण्यात येणार आहे यासाठी कुणाचीही पावती अथवा देणगी असणार नाही
२) हे आंदोलन करण्याचा उदात्त हेतू आहे यामध्ये मी स्वतः केंद्रप्रमुख , विस्ताराधिकारी या पदोन्नतीचा लाभार्थी नाही याऊलट मी 2014 मध्ये घेतलेली मुख्याध्यापक पदोन्नती पदानवत केलेली आहे त्यामुळे हे आंदोलन करण्यामध्ये माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही
३) मी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतन श्रेणी चा लाभार्थी देखील नाही
४)सदरील आंदोलन हे माझ्या शिक्षक बांधवांच्या अनेक दिवसापासून च्या प्रलंबित प्रश्नासाठीच आहे कारण या पदोन्नतीची अपेक्षा करत माझे अनेक शिक्षक बांधव सेवानिवृत्त होत आहेत
५)
हे आंदोलन करण्याची प्रेरणा मला माझ्या शिक्षक बांधवांच्या सहकार्यातून मिळालेली आहे
६) जोपर्यंत हे सर्व प्रश्न निकाली निघत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन अविरतपणे चालू राहणार आहे
७) जालना जिल्हा परिषद मध्ये मागील 25 वर्षाच्या कार्यकाळात मी माझे एकही वैयक्तिक काम संघटनेच्या वा इतर दबावातून करून घेतलेले नाही त्यामुळे नैतिक बळावर मी हे आंदोलन करत आहे
अर्थातच आपल्या सर्वांच्या शुभेच्छा मात्र आवश्यक आहेत
आपला स्नेहांकित