निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम दिनांक ०५ मार्च २०२५ चा शासन निर्णय nipun maharashtra shasan nirnay
विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत
प्रस्तावना-
राज्यात शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी वेळोवेळी विविध शैक्षणिक कार्यक्रम लागू करण्यात आले आहेत. संदर्भ क्र. २ अन्वये राज्यात निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान लागू करण्यात आले आहे. संदर्भ क्र. ३ अन्वये निपुण भारत अंतर्गत सुधारित लक्ष्ये देण्यात आलेली आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातील, “प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षणव्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असेल. ही अगदी प्राथमिक अध्ययन आवश्यकता (म्हणजे, मूलभूत पातळीवरील वाचन, लेखन आणि अंकगणित) आधीच साध्य केली तरच, हे उर्वरित धोरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल” हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे.
सबब, सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) प्राप्त करण्यासाठी त्वरित एक अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक, समाज व शासकीय यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच NAS व ASER यांसारख्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध सर्वेक्षण अहवालांमध्ये राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत जी स्थिती दर्शविण्यात आलेली आहे त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी लक्ष्य केंद्रित कामकाज करणे आवश्यक झालेले आहे.
निपुण महाराष्ट्र अभियान शासन निर्णय दिनांक 5 मार्च 2025 pdf डाउनलोड करा