निपुण भारत अभियान अंतर्गत निर्धारित करण्यात आलेले सुधारित लक्ष्य NCF-FS अवगत करणेबाबत nipun bharat shasan nirnay
संदर्भ : १. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
२. निपुण भारत अभियान भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मार्गदर्शन सूचना.
३. निपुण भारत अभियान अंमलबजावणीचावत शासन निर्णय / २०२१-संकीर्ण प्रएस/१७९.क्र.डी- ६२७-दिनांक. ऑक्टोबर २०२१.
४. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क. राशैसंप्रपम/मभावि/निनाअ/२०२२/५१४६. दि.३१.१०.२०२२
५. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२२
६. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२३
७. राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२३
८. शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांचे दि. २०/०८/२०२४ रोजीचे पत्र. ९. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे दि. ६/०९/२०२४ रोजीचे पत्र.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार तसेच निपुण भारत अभियान मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावरून विविध उपक्रमांचे
नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी संदर्भ क.३ नुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यापूर्वी यानुसार निपुण भारत अभियानाचे उद्दिष्ट बालवाटिका ते इयत्ता तिसरीपर्यंतच्या (३ ते ९ वर्ष वयोगट) सर्व विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ अखेर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करणे हे होते. सदर वयोगटानुसार इयत्तानिहाय लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले होते.
👉👉निपुण भारत शासन निर्णय येथे पहा Click Here
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणाच्या स्तरांची पुनर्रचना करण्यात आली. या धोरणात सुचविल्यानुसार ५+३+३+४ या नवीन संरचनेचा स्वीकार करण्यात आला आहे. यानुसार, पायाभूत स्तर-
बालबाटिका ते इयत्ता दुसरी पर्यंत असून पूर्वतयारी स्तर इयत्ता तिसरी ते पाचवी असा आहे.
यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२२, व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२३ ची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच राज्य स्तरावर उपरोक्त संरचनेनुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत स्तर व शालेय शिक्षण पांची निर्मिती करण्यात आली आहे.
याकरिता उपरोक्त सुधारित संरचना व निपुण भारत अभियान याचेशी संबंधित बयोगट यामध्ये एकवाक्यता असण्यासाठी संदर्भ क्र. ८ नुसार शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांनी उपरोक्त बदललेल्या संरचनेनुसार निपुण भारत अभियान अंतर्गत समाविष्ट वयोगट व लक्ष्य यामध्ये केलेली सुधारणा सर्व संबंधित घटकांना अवगत करण्याबाबत कळविले आहे.
निपुण भारत अभियानाचे सुधारित उद्दिष्ट व वयोगट
✓ निपुण भारत अभियानामध्ये वर्ष ३ ते ८ अयोगट (पहिले तीन वर्ष बालवाटिका, इयत्ता पहिली व दुसरी)
समाविष्ट असेल. ✓ निपुण भारत अभियान उद्दिष्ट ३ ते ८ वयोगट (पहिले तीन वर्ष बालवाटिका व इयत्ता पहिली व दुसरी)
मधील सर्व विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ अखेर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक लक्ष्य प्राप्त करणे.
निपुण भारत अभियानाचे सुधारित लक्ष्य (Revised Lakshyas aligned with NCF – FS)
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साठी लक्ष्ये/ध्येये बालवाटीका किंवा वयोगट ५-६ वर्षे
मित्र आणि शिक्षकांसोबत बोलतो.
बडबडगीते/कविता आकलनासह म्हणतो
१. मित्र आणि शिक्षकांसोबत बोलतो.
२.बडबडगीते /कविता आकलनासह म्हणतो.
कुतुहलाने पुस्तक पाहतो आणि चित्राच्या सहाय्याने गोष्ट वाचण्याचा प्रयत्र करतो.
२ काही परिचयाचे सतत दृष्टीक्षेपात येणारे / यमक जुळणारे शब्द (Sight words, उचे/खाऊची वेष्टने यावरील शब्द) याकडे लक्ष वेधण्यास सुरुवात करतो.
३. अक्षरे आणि संबंधित ध्वनी ओळखतो
४ कमीत कमी २-३ अक्षरापासून तयार केलेले शब्द वाचतो.
१. म्व-अभिव्यक्तीसाठी गिरगिटती / रेघोट्या मारतो/चित्र काढतो व रंगवतो.
२. ओळखण्यायोग्य अक्षरे लिहिण्यास सुरवात करतो.
३. पेन्सिलचा वापर करतो आणि ओळखण्यायोग्य अक्षरे लिहिण्यासाठी पेन्सिल योग्य प्रकारे धरतो.
४.स्वतःचे नाव ओळखतो/लिहितो.
१ वस्तूंची गणना करतो आणि ९ पर्यंतच्या संख्याचिन्हाशी (Numerals) जोडी लावतो.
२ ९ पर्यंतचे अंक ओळखतो, वाचतो आणि लिहितो.
R साधे आकृतिबंध ओळखतो, पुनरावृत्ती करतो / रेखाटत्तो.
दोन गटातील वस्तूंची त्यांच्या संख्येनुसार तुलना करती. याकरिता च्या पेक्षा जास्त /
कमी/समान इत्यादी शब्द वापरतो. संख्या वस्तू/आकार / घटना यांची क्रमवार मांडणी करतो
👉👉निपुण भारत शासन निर्णय येथे पहा Click Here
६. निरीक्षणक्षम वैशिष्ट्यांच्या आधारे वस्तूंचे वर्गीकरण करतो आणि वर्गीकरण निकषांविषयी चर्चा करतो.
७.त्याच्या/तिच्या सभोवतालच्या विविध वस्तूंच्या संदर्भात तुलनात्मक शब्द वापरतो. उदा लांब सर्वांत लांब, उंच सर्वांत उंच आखूड सर्वात आखूड, पेक्षा जड/पेक्षा हलका इत्यादी.
इयत्ता पहिली / वयोगट ६-७ वर्षे
परिचित व्यक्ती, भोवतालचा परिसर, गरजा याबद्दल मित्र व वर्गशिक्षकाना प्रश्न
वाचन
लेखन
संख्याज्ञान
१.
विचारतो व संभाषण करतो. २. शालेय परिसर / वातावरण व वर्गातील मजकूर समृद्ध पातावरण याबद्दल बोलतो.
३. बडबडगीते/कविता/गाणी साभिनय म्हणतो. प्रकट वाचन /कथाकथनात सक्रीय सहभाग घेतो, कथाकथना दरम्यान आणि नंतरच्या
प्रश्नांना प्रतिसाद देतो, आवश्यक साहित्य / कठपुतळ्यांच्या सहाय्याने परिचित कया, माहित्य इत्यादींचे सादरीकरण करतो
२ नवीन शब्दांचे वाचन करण्यासाठी ध्वनी आणि चिन्हे । प्रतीके यांचा वापर करतो.
वयानुरूप अपरिचित मजकुरातील ४-५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
१. परिचित संदभर्भाने येणाऱ्या शब्दांतील मात्रा ओळखतो. (कथा, कविता, परिसरातील छापील मजकूर इत्यादी)
लेखन
२. कार्यपुस्तिका शुभेच्या पत्रे वस्तूंची वा व्यक्तींची ओळखण्याजोगी बित्रे काढतो तसेच त्यातून सुयोग्य असा प्रतीत होणारा अर्थ दर्शविण्यासाठी लेखन करतो. १
. वस्तू मोजतो व २० पर्यंत संख्याबोध (Number Sense) विकसित करतो.
परिसरातील आकारांचे आणि संख्यांचे सोपे आकृतिबंध ओळखतो आणि विस्तार करतो. दैनंदिन जीवनात ९ पर्यंतच्या संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकीचा (२० पर्यंत उत्तर येईल ) उपयोग करतो.
त्याच्या/तिच्या सभोवतालच्या त्रिमितीय आकारांच्या (घनाकृती आकार) भौतिक गुणधर्माचे निरीक्षण आणि वर्णन करती उदा वक्राकार / सपाट पृष्ठभाग, कोपरे आणि कडांची संख्या इ.
अप्रमाणित / असमान एककांच्या सहाय्याने लांबीचा अंदाज व पडताळा घेतो उदा बीत पाऊल बोटे इत्यादी. तसेच, अप्रमाणित / असमान एककांच्या सहाय्याने धारकतेबाबत अंदाज व पडताळा घेतो. उदा. कप, चमचा, मग इत्यादी. भारतीय चलनातील २० पर्यंतच्या नाणी व नोटा ओळखतो.
इयत्ता दुसरी किंवा वयोगट ७-८ वर्षे
वर्गात उपलब्ध असलेल्या मुद्रित माहित्याबद्दल बोलतो.
प्रश्न विचारण्यासाठी संभाषणात व्यस्त राहतो व इतरांचे ऐकतो.
कविता / गाणी म्हणतो.
कथा/कविता/मुद्रित साहित्यामध्ये येणाऱ्या परिचित शब्दांची पुनरावृत्ती करतो.
बालसाहित्य/पुस्तकातील कथांचे वर्णन करतो तसेच इतरांना सांगतो दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून नवीन शब्द तयार करतो.
वयानुरूप सोप्या शब्दांनी बनलेल्या ६ ते ८ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने, अचूकतेने आकलनासह वाचतो
स्वतः व्यक्त होण्यासाठी लहान / सोपी वाक्ये अचूकपणे लिहितो सोपी ४ ते ५ अशी सुवाच्य वाक्ये लिहितो.
बस्तू मोजतो व ९९ पर्यंत संख्याबोध (Number Sense) विकसित करती, विविध आकार व संख्या यापासून नवीन आकृतिबंध तयार करतो.
दैनंदिन जीवनात ९९ पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो.
गुणाकार हा बेरजेची पुनरावृत्ती व भागाकार हा समान वाटप अथवा हिस्सा म्हणून करतो तसेच गुणाकार तथ्ये (Multiplication facts) समजून घेतो. (२,३ आणि ४ चे पाढे
मदतीने)
आयत्त, त्रिकोण, वर्तुळ, लंबवर्तुळ मारखे द्विमितीय आकार ओळखत्तो व वर्णन करतो.
अप्रमाणित/असमान एकके वापरून लांची, अंतर, धारकता यांचा अंदाज घेती व मोजतो. उदा. काठी, पेन्सील, धागा, पेला, चमचा, मग इत्यादी साधा तराजू बापरून वजनाची तुलना करतो.
जवळ / दूर, आत/बाहेर, च्या वर/च्या खाली, डाबीकडे / उजवीकडे, पुडे/मागे, वर/खाली या अवकाशीय संबंध दर्शविणाऱ्या शब्दांचा वापर करतो.
👉👉निपुण भारत शासन निर्णय संपूर्ण माहिती परिपत्रक येथे पहा Click Here
100 रु.पर्यंतची रक्कम वापरून साधे व्यवहार करतो.
Oral Language
REVISED LAKSHYA (In alignment with NCF-FS)
Balvatika Or Age 5-6
Talks to friends and teachers.
Recites rhymes/ poems with understanding.
Looks at books and attempts reading the story with the help of pictures
Begins to point out and recognize some familiar repeated/rhyming words ( sight words or words on containers/ food wrappers)
Recognizes letters and corresponding sounds.
Reads simple words compromising of at least 2-3 alphabets.
Scribbles/draws and paints for self expression.
Begins to form recognizable letters.
Uses a pencil and holds it properly to form recognizable letters.
Recognizes and writes his her own name.
Counts objects and correlates numerals up to 9.
Recognizes, reads and writes numerals up to 9.
Identifies and copies/draws simple patterns..
Compares two groups in terms of number of objects and uses words like more.
than/less than /equal to etc.
Arranges numbers/objects/shapes/occurrence of events in a sequence.
उपरोक्त सुधारित लक्ष्यबाबत संदर्भ क्र.८ मधील मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात तात्काळ कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी.
सूचना-
१. आपल्या कार्यक्षेत्रातील अभियानाशी संबंधित सर्व घटक जसे, क्षेत्रीय अधिकारी, शैक्षणिक संस्था, शाळा, शिक्षक, पालक व विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक संस्था प्रतिनिधी यांना इयत्तानिहाय सुधारित लक्ष्यबाबत अवगत करावे. याकरिता सर्व आवश्यक माध्यमांचा वापर करावा जेणेकरून सर्वांपर्यंत सदर योग्य माहिती वेळेत पोहोचेल.
२. प्रत्येक शाळा व संबंधित संस्था मध्ये निपुण भारत अभियान प्रतिज्ञा पोस्टर / भित्तीपत्रक प्रदर्शित करावे.
३. प्रत्येक शाळा व संबंधित संस्था मध्ये निपुण भारत अभियान सुधारित इयत्ता वयोगटनिहाय लक्ष्य यांचे पोस्टर/भित्ती पत्रक प्रदर्शित करावे,
४. निपुण भारत अभियान अंतर्गत प्रत्येक वर्गात निपुण भारत अभियानाची ३ ध्येये व संबंधित अध्ययन
निष्पत्ती प्रिंट स्वरुपात (हार्ड कॉपी) उपलब्ध असावेत. सदर संदर्भीय ध्येये व संबंधित अध्ययन निष्पत्ती राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२३ मध्ये परिशिष्ट मध्ये देण्यात आल्या आहेत. त्यांचे अवलोकन करावे. (सदर आराखडा परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
निपुण भारत अभियान जिल्हास्तरीय अंमलबजावणी आडावा कार्यशाळा
अभियानचे उद्दिष्ट व लक्ष्य सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त होण्याच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यातील निपुण भारत अभियान प्रभावी विषयक होणारी अंमलबजावणी, पुढील नियोजन, Best Practices, येणाऱ्या अडचणी
याविषयक कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. तारीख व वेळ मेल द्वारे यथावकाश कळविण्यात येईल. उपरोक्त नुसार माहिती संबंधित सर्वांपर्यंत तात्काळ पोहोचवावी, तसेच निपुण भारत अभियानचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक कालबद्ध आराखडा तयार करावा व उपरोक्त नुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालायास तात्काळ सादर करावा.
सोबत – निपुण प्रतिज्ञा