राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२४ राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन navinyapurn activity teacher awards spardha
*राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२४*
*_राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन_*
शिक्षक ध्येय, सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड, हिंद एज्युकेशन सोसायटी, दापोली जिल्हा रत्नागिरी, मिलिंद दीक्षित, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक वाचक वर्ग आहे.
पहिल्या वर्षी ५ सप्टेंबर २०२० रोजी ५९ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते.
दुसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२१ रोजी ५६ तसेच
तिसऱ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२२ रोजी २० आणि
चौथ्या वर्षी ५ सप्टेंबर २०२३ रोजी ४२ विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
*स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे.*
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार आहे.
*राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.*
अ) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी)
ब) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत)
राज्यातील शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक तसेच शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रात मुक्तपणे कार्य करणाऱ्या संस्था या सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
*उपक्रम अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.*
1) उपक्रमाचे शीर्षक
2) उपक्रमाची गरज व महत्त्व
3) उद्दिष्टे
4) नियोजन
5) यशस्वीता /निष्कर्ष
6) समारोप /फायदे
7) परिशिष्टे
8) उपक्रमाची सद्यस्थिती
9) *पीडीएफला (स्वत:चे नाव व गट) असे नाव द्यावे. उदा. सुनील पाटील गट अ*
10) स्वत: शाळेत राबविल्याचे स्वत:च्या सहीचे प्रमाणपत्र सोबत पाठवावे. नमुना प्रमाणपत्रासाठी …
CLICK HERE…
https://drive.google.com/file/d/1hvpJAVb76UncNACgNmojpKuINXFr6bNz/view?usp=drivesdk
या मुद्द्यांचा समावेश असावा.
शब्दमर्यादा 3000 शब्द असून जास्तीत जास्त 10 फोटोचा वापर करावा. अहवाल 10 एम बी पर्यंत (जास्त नको) पीडीएफ स्वरूपात तयार करून फक्त 9623237135 याच व्हाट्सअॅप नंबरवर व्हाट्सअॅपनेच पाठवायचा आहे. (इतर नंबरवर पाठविल्यास विचारात घेतला जाणार नाही)
शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत एम. एस. वर्ड मध्ये टायपिंग करून नंतर त्याची पीडीएफ pdf करून पाठवावी. उपक्रम हा शिक्षकांनी यापूर्वी स्वत: राबविलेला असावा.
*उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.*
१) 9623237135 या व्हॉट्सॲप नंबर वर उपक्रम अहवाल पीडीएफ पाठवावी.
*खाली चार नमुना उपक्रम अहवाल दिलेले आहेत..* वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
1.
https://drive.google.com/file/d/1wifHGfWPC099Gm-SBbBN15uIX3tXov8D/view?usp=drivesdk
2. https://drive.google.com/file/d/1I3_Tg5jTuFUmyWrNF8lF8FQWnrLvzlGM/view?usp=drivesdk
3. https://drive.google.com/file/d/1I706LZMXIqbw8-BNrags_eoZdElmqJda/view?usp=drivesdk
4. https://drive.google.com/file/d/1I72X1i_2zXG0XZ2ek6wD86_nMoNfWEWY/view?usp=drivesdk
विजेत्या उपक्रमशील शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रिंट प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयची प्रिंट मासिक देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे 50+ डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.
*नोंदणी शुल्काचे दोन पर्याय आहेत..*
*1) रु. 600 (वार्षिक वर्गणीसह)*
किंवा
*2) रु. 500 (फक्त नोंदणी शुल्क)*
नोंदणी शुल्क 600 किंवा 500 रुपये फोन पे किंवा गुगल पे द्वारे
96 23 23 71 35 या नंबरवर पाठवावे.
पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट उपक्रम pdf च्या खाली 9623237135 या नंबरवर पाठवावा.
*शिक्षक ध्येयची वार्षिक वर्गणी 500 रुपये असून त्यात पुढील वर्षभरात 52 अंक + मागील 200 अंक (असे एकूण 252+) अंक* देखील शिक्षक ध्येय इंडिया या अॅपवर वाचण्यासाठी लगेच उपलब्ध होतील.
*लक्षात घ्या: शिक्षक ध्येयचा संपूर्ण अंक प्रत्येक सोमवारी 153 व्हाटसएप ग्रुपवर मोफत दिला जात नाही.)*
*स्पर्धेचा निकाल दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी ‘शिक्षक दिनी’* राज्यातील विविध वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येईल.
*राज्यातील उपक्रमशील शिक्षक व शिक्षिका यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड, हिंद एज्युकेशन सोसायटी, दापोली जिल्हा रत्नागिरी, मिलिंद दीक्षित, वर्धा यांनी* तसेच शिक्षक ध्येयच्या संपादकीय मंडळातर्फे करण्यात येत आहे.
*असा असावा उपक्रम अहवाल :*
1) उपक्रम एम. एस. वर्ड मध्ये टायपिंग करुन त्याची pdf करुन पाठवावी.
2) एका शिक्षकांस दोन-तीन उपक्रम पाठविता येतील (प्रत्येकी नोंदणी शुल्क द्यावे लागेल.)
3) शब्द किंवा पाने यांची कुठलीही मर्यादा नाही. पीडीएफ 10 MB च्या आत असावी
5) *अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2024* असून ती पुढे वाढविण्यात येणार नाही.
6) संपादकीय मंडळातील शिक्षक, शिक्षिका देखील यात उपक्रम पाठवून सहभागी होऊ शकता.
7) सकारात्मक विचारसरणी ठेऊन यात सर्वांनी सहभाग नोंदवावा कारण ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
8) निकाल जाहीर झाल्यानंतर वाद घालण्याची सवय असणाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊ नये.
8) उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास 9623237135 या नंबरवर किंवा संपादकीय मंडळाशी संपर्क करावा.
*सर्वात महत्त्वाचे:* शुल्क जमा केल्याचा स्क्रीनशॉटसह आपले नाव, गट A किंवा B, आपला संपूर्ण पत्ता, पिनकोड, मोबाईल नंबर इ. तपशील 9623237135 या नंबरला उपक्रम पी डी एफ च्या खाली व्हाटसअॅपवर पाठवावा.
स्क्रीन शॉट न पाठविलेले उपक्रम विचारात घेतले जाणार नाही.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
निकाल लागल्यानंतर वाद घालण्याची सवय असलेल्यांनी यात सहभागी होऊ नये.
*_शिक्षक ध्येयच्या उपसंपादिका, उपसंपादक, प्रतिनिधी यांचे कडेही आपण प्रस्ताव आणि नोंदणी शुल्क जमा करु शकता…_*
_राज्यस्तरीय संपादकीय मंडळ, साप्ताहिक शिक्षक ध्येय, महाराष्ट्र_