राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०२४ राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार national teachers award 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०२४ राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार national teachers award 

परिपत्रक:-प्रतिवर्षी केंद्र शासनाकडून विविध राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. सन २०२४ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या संदर्भाधिन क्र.१, दिनांक २७ जून, २०२४ च्या अनुषंगाने सहा शिक्षकांची नामांकने ऑनलाईन पोर्टलद्वारे केंद्र शासनास कळविण्यात आली होती.

२. सन २०२४ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील श्री. मंथैह चीन्नी बेडके (MANTAIAH CHINNI BEDKE), शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजवंडी, जाजवंडी ४४२७०४ व श्री. सागर चितरंजन बगाडे (SAGAR CHITTARANJAN BAGADE), शिक्षक, सौ. एस.एम. लोहिया हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर, कोल्हापूर ४१६०१२ या दोन शिक्षकांची निवड केल्याचे

केंद्र शासनाने संदर्भाधिन क्र.२ येथील दिनांक २७ ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये कळविले आहे. ३. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिनांक ०५ सप्टेंबर, २०२४ रोजी होणार आहे.

४. सदर पुरस्कार्थी निवासाबाबतची माहिती सहसचिव (NAT) शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या दि. २७.०८.२०२४ रोजीच्या पत्रात नमूद केल्यानुसार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार्थी यांना कळविण्याची कार्यवाही शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी करावी.

शासन परिपत्रक क्रमांकः पीटीसी-२०२४/प्र.क्र.६०/टीएनटी-४

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२४०८२८१६२१४१९८२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Join Now

Leave a Comment