मेगा अपार दिवस (Mega APAAR Diwas) साजरा करणेबाबत.

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मेगा अपार दिवस (Mega APAAR Diwas) साजरा करणेबाबत.

केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार आपणास कळविण्यात येते की, दि.०९ व दि.१०, डिसेंबर, २०२४ या दोन्ही दिवशी ‘मेगा अपार दिवस’ (Mega APAAR Diwas) साजरा करण्याकरीता आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी. त्याचप्रमाणे हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी खाजगी शाळांसह राज्यातील सर्व शाळांमध्ये जास्तीत जास्त अपार आयडी तयार होतील याची दक्षता घ्यावी, ही विनंती

Mega APAAR DIWAS” दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी सर्व शाळांमध्ये साजरा करणेबाबत.

संदर्भ : १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O. No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. २७/११/२०२४

उपरोक्त संदर्भिय पत्राव्दारे केंद्र शासनाकडून “Mega APAAR DIWAS” दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी साजरा करण्यासाठी कळविले आहे. या कार्यालयाकडून दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२४ रोजी APAAR DAY राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०६/१२/२०२४ पर्यंत राज्यातील ६०.७५% विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून APAAR आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेवून राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. ९ व १० डिसेंबर, २०२४ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळामध्ये ‘APAAR दिवस’ साजरा करण्यात यावा.

कर्मचाऱ्यांचा तीन टक्के वाढीव महागाई भत्ता अदा करणे बाबत

कंत्राटी शिक्षक भरती स्थगित

वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीनेच

शैक्षणिक वर्ष 2025 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

कंत्राटी शिक्षक भरती रद्द

सदर दिवशी APAAR आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहिम विस्तृत स्वरुपात राबविण्यात यावी.

जिल्हा, तालुका व मनपा स्तरावरून APAAR आयडीबाबत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेवून संबंधितांना सूचना द्याव्यात.

दि. ९ व १० डिसेंबर, २०२४ रोजी गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी मनपा, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून APAAR आयडी तयार करण्याबाबत मुख्याध्यापकांचा आढावा घ्यावा.

जिल्हा, तालुका व मनपा कार्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी तसेच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे APAAR आयडी

तयार करण्यााबाबत नोंदणी पुर्ण होईल याची दक्षता घ्यावी. प्रणाली मधील अहवालानुसार ज्या शाळांनी विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्याची कार्यवाही सुरुच केलेली नाही, अशा शाळांना जिल्हा, तालुका व मनपा

स्तरावरुन तात्काळ सूचना देवून अडचणी असल्यास मुख्याध्यापकांना तालुका

कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगावे व त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे.

जिल्हा, तालुका, मनपा व केंद्र स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रथम प्राधान्याने नियोजन करण्यात यावे व दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२४ रोजी “Mega APAAR DIWAS” साजरा करण्यात यावा.

अपार दिवस साजरा करण्याबाबत शासन परिपत्रक येथे पहा

Join Now