यु-डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना appar id
संदर्भ : भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी तयार करून घेण्याकरिता कळविले आहे. APAAR आयडी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यु-डायस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये (SDMIS) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भिय पत्रात नमूद आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमधून APAAR आयडी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.
APAAR आयडी उपयोगिता :-
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
APAAR आयडी हा १२ अंकी असून एकमेव असणार आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार Validation झाले आहे त्याच विद्यार्थ्यांचे APAAR आयडी Generate होतील.
computer dec1U-DISE 2024-25/APAARLetter.dox जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई ४०० ००४. टेलिफोन नं. ०२२-२३६३६३१४, २०६७ ९२६७, २३६७ १८०८, २३६७ ९८०९, २३६७ ९२७४ ई-मेल: mpspmah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in संकेतस्थळ https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in
APAAR आयडीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा (OoSC) मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत
करणे, इ. बाबीं डिजिटल नियंत्रित करण्यात येतील. APAAR आयडी तयार झाल्यानंतर Digi locker ला जोडण्यात येणार आहे.
Digi locker ला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांने शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य,
इयत्ता १०वी व १२वी बोर्ड परीक्षेचे निकाल, holistic report card and extracurricular accomplishments ऑनलाईन पध्दतीने बघता येईल.
APAAR आयडी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने पाठविणे सुलभ होईल.
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी विद्या समिक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर Graphical Analysis करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबविण्यात येतील.
जबाबदारी :-
महाराष्ट्र राज्याकरिता राज्यस्तरावरून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा