शासकीय कर्मचारी वैद्यकीय खर्चाचे सर्व नियम व अटी सर्व माहिती पीडीएफ medical bill

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय कर्मचारी वैद्यकीय खर्चाचे सर्व नियम व अटी सर्व माहिती पीडीएफ medical bill

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे नियम महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये व त्यानंतर त्यात केलेल्या सुधारणा नुसार विहित केलेले आहेत.

 वैद्यकीय खर्चाचे नियम व अटी पीडीएफ येथे पहा

👉PDF download 

 

१) सदर नियमान्वये

• अ) रुग्ण म्हणजे

१. शासकीय कर्मचारी किंवा त्याच्या कुटंबातील कोणतीही व्यक्ती.

२. रजेवर किंवा निलंबित असलेले शासकीय कर्मचारी.

३. पूर्ण वेळ शासकीय सेवेत कार्यरत असलेला कायम अथवा तात्पुरता शासकीय कर्मचारी. शासकीय कर्मचाऱ्याची एक वर्षापेक्षा जास्त सेवा होणे आवश्यक आहे.

* ब) कुटुंब म्हणजे

१. शासकीय कर्मचाऱ्याची पती/पत्नी

२. शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेली औरस मुले / सावत्र मुले / कायदेशीर दत्तक घेतलेली मुले

३. शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आई-वडील (निवृत्ती वेतन मुळ वेतनाच्या रुपये ३५००/- सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दि.११.११.२०११.) (महिला कर्मचाऱ्याला तिच्या आई-वडीलांची किंवा सासु-सासऱ्याची निवड करता येईल.)

४. शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेला १८ वर्षाखालील भाऊ / अविवाहित बहिण व घटस्फोटातील बहिणी (वय लक्षात न घेता.)

* क) कुटुंबाची संख्या

१. शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक २०/११/२००० पासून (लागू दिनांक ०१/०५/२००१) शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकिय लाभासाठी दोन हयात अपत्याइतके आपले कुटुंब मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

२. ०१ मे, २००१ नंतर त्यांच्या कुटुंबातील अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास आई-वडीलांना व सदर मुलालावैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती मिळण्याचा हक्क राहणार नाही.

३. मात्र पहिल्या दोन मुलांना वैद्यकीय सोयी मिळण्याचा हक्क राहिल तसेच जर सदर कुटुंबाने त्यानंतर सक्षम प्राधिकारी अधिकाऱ्याकडून निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास आई-वडीलांना वैद्यकीय सवलती मिळण्याचा हक्क पुन्हा राहील. मात्र तिसऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना अशा सवलती मिळणार नाहीत.

४. सदरचाच नियम तीन हयात मुलांच्याबाबतीमध्ये १/५/२००१ पूर्वी लागू राहील. शासन अधिसूचना क्र. एमआरव्ही-२०००/प्र.क्र. (१७/२०००)/बारा, दि.

२८/३/२००५ नुसार शासकीय सेवेत लागताना सध्या छोटे कुटुंबप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

६) २७ गंभीर आजारांची यादी

शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्र.एमएजी २००५/९/प्र.क्र.१/आ.३, दि.१९ मार्च २००५ चे सहपत्र

परिशिष्ट अ

शासन नितीरिष्ठ २७ आकस्मिक व ५ गंभीर आजाराची यादी.

१.) हृदयविकाराचा झटका ( Cardiac emergancy) प्रमस्तिक संहनी (Cerabral vascular) फुफ्फुसाच्या विकाराचा झटका (Pumonary emergency) ऑन्जिओग्राफी चाचणी.

२) अति रक्तदाब (Hypertension)

३) धनुवार्त (Titanus)

४) घटसर्प (Diphteria)

५) अपघात (Accident) आघात संरक्षण (Shock Syndrome) हृदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधी (Cardiological and Vascular) 3/11

६) गर्भपात (Abrtions)

७) तीव्र उदर वेदना /आंत्र अवरोध (Actue abdominal pains/ Intestinal Obstrution)

८) जोरदार रक्तस्त्राव (Severe haemorrhage) ९) गॅस्ट्रो-एन्ट्रायटिस (Gastro- Enterietis)

१०) विषमज्वर (Tuphoid)

११) निश्चतेनावस्था (Coma)

१२) मनोविकृती सुरुवात (Onset of psychiatric disorder)

१३) डोळ्यातील दृष्टिपटल सरकणे (Retinal detachment in the eye)

१४) स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार (Foreign body in ear, nose or throat emergency)

१५) जननमुत्र आमस्कि आजार (Genito- Urinary emerency)

१६ वायू कोथ (Gas gangrine)

१७ कान नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार (Foreign body in ear,

nose or throt emergency)

१८) ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती (Cogenital Anamolies requiring

urgent surgical intervention)

१९) ब्रेन ट्यूमर (Brain Tumour)

२०) भाजणे (Burns)

२१) इपिलेप्सी (Epilepsy)

२२) अॅक्यूट ग्लॅकोमा (Acute Glaucoma)

२३) स्पायपनस स्कॉड (मज्जारज्जू) संबंधात आकस्मिक आजार

२३) उष्माघात

२५) रक्तासंबंधातील आंजार

२६) प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा

२७) रसायनामुळे होणारी विषबाधा

वैद्यकिय अग्रिम मंजूर करताना खालील अटी व शर्ती आहेत.

१. सदरचे अग्रिम हे फक्त ५ गंभीर आजारांकरीता शासकीय अथवा सदर आजारांकरीता शासनमान्य खाजगी रुग्णालयांकरीताच मंजूर करता येते.

२. कर्मचारी जर अस्थायी असेल तर त्याने दोन स्थायी कर्मचाऱ्यांचे जामीन देणे आवश्यक आहे. तसेच सोबत कुटुंब प्रमाणपत्र जोडावे.

३. अग्रिमासोबत रुग्णालयाचे शस्त्रक्रियेचा दिनांक व शस्त्रक्रियेकरीता संभाव्य खर्च दर्शविणारे पत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच अग्रिमाचा धनादेश संबंधित रुग्णालयाच्या नावानेच देणे आवश्यक आहे.

४. सदरचे अग्रिम हे संबंधित कर्मचाऱ्यास शस्त्रक्रिये पुर्वी जास्तीत १५ दिवस आधी देता येते.

५. ज्या कारणासाठी अग्रिम मंजूर करण्यात आले आहे, त्याच कारणासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे.

६. अग्रिम मंजूर झाल्यापासून ६ महिन्यांत त्याचे समायोजन होणे आवश्यक आहे, अन्यथा अग्रिमाची वसुली घरबांधणी अग्रिमासंबंधीच्या व्याजदराने करण्यात येईल.

१३) वैद्यकिय अग्रिम मंजूरीचे अधिकार :-

१४) विशिष्ट आजारांची खर्च प्रतिपूर्ती :-

शासकीय कर्मचाऱ्याला काही विशिष्ट आजारांच्या खर्चाची प्रतिपूर्ती खालील प्रमाणे देय ठरविण्यात आलेली आहे.

१. मधुमेहः – रुग्णाला मधुमेह झाल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याकडुन प्रमाणपत्र घ्यावे लागते. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पुढील औषोधपचारांसाठी प्रत्येक वेळेस नविन प्रमाणपत्र घेण्याची आवश्यक्यता नाही मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा कुटुंबातील इतर व्यक्तींना प्रत्येक आजाराच्या वेळेस नवीन प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यक्यता राहील.

२. डायलेसिस :- शासकीय कर्मचारी / अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर, मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी व अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर डायलिसिस करवून घेतल्यास त्यावरील शासकीय अथवा खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय ठरविण्यात येत आहे.

वरील रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी जिल्हा स्तरावर उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली तर मुंबई शहरातील प्रकरणांसाठी संचालक, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती डायलेसिस करण्याची आवश्यक्यता व डायलेसिसवर उध्दभवलेला खर्च याची शहानिशा करुन प्रतिपूर्तीच्या रक्कमेची शिफारश करील मात्र सदरची रक्कम ही जसलोक रुग्णालय मुंबई येथे आकारल्या जाणाऱ्या रक्कमेपेक्षा अधिक असणार नाही.

३(अ). काही विशिष्ट आजाराकरीता शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या दरानेच रकमा देय होतात. उदा. शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग 8.2C/8/2098 अन्वये खाजगी रुग्णालयात कर्करोगावरील उपचार घेतल्यास देय होणाऱ्या रकमा निश्चित करण्यात आलेल्या आहेत

3(4). तर सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे पत्र दि. १५/२/२०१६ अन्वये खाजगी रुग्णाल रोगाबाबत घेतलेल्या उपचाराबाबत द्यावयाच्या रकमा निश्चित केलेल्या आहेत.

४. शासन मान्य खाजगी रुग्णालयात बाहय रुग्ण म्हणून उपचार घेतल्यास सदर वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देय होत नाही मात्र शासन निर्णय ३१/१/२०१२ अन्वये शासकीय कर्मचारी / अधिकारी व त्यांचे कुटुंबिय यांच्यावर शासनमान्य रुग्णालयात हृदय विकाराशी संबंधित गंभीर आजारावर (हृदय शस्त्रक्रिया Heart Surgery, हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया Bypass surgery व अॅन्जोप्लास्टी – शस्त्रक्रिया) शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या बाहय रुग्ण (Follow up) उपचारावरील (वैद्यकिय सल्ला शुल्क, औषधे व तपासण्या) खर्चाची प्रतिपूर्ती रु.१५,०००/- मर्यादेपर्यंत अनुज्ञेय ठरविण्यात आले आहे.

१५) वैद्यकिय खर्च प्रतिपूर्तीचे देयक सादर करताना खालील बाबी प्रामुख्याने लक्षात ठेवणे

आवश्यक आहे :-

१. परिशिष्ट १ पुर्ण भरावे.

२. नमुना क व ड वरील सर्व रकाने व्यवस्थित भरुन दोन्ही मधील रकमा जुळणे आवश्यक आहे.

३. नमुना ड वर रुग्णालयाचा नोंदणी क्रमांक न चुकता नमुद करावा.

४. औषधांची प्रमाणके संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याकडुन प्रमाणित करुन घ्यावीत.

५. देयकासोबत सर्व चाचणी अहवाल जोडावेत.

६. ज्या कालावधीत रुग्ण आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल असेल, त्याच कालावधीतील औषधे / चाचण्या / उपकरणे यांच्या रकमा देयकात घेण्यात याव्यात.

७. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर देयक सादर केल्यास कर्मचाऱ्याने देयक कार्यालयास सादर केल्यानंतर देयकाच्या झालेल्या प्रवासाबद्दत प्रत्येक टप्पेनिहाय नमूद करावे.

८. ज्या लेखाशिर्षाखाली देयक खर्ची टाकावयाचे आहे, त्याचा संपूर्ण तपशिल प्रस्तावात न चुकता

नमूद करावा. ९. वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयकाकरीता www.mahakosh.in या संकेतस्थळावरील Employee Corner – Useful Form या लिंकवरील दिलेल्या विवरणपत्रातच देयक सादर करावे.

१०. काही कर्मचाऱ्यांकडुन बऱ्याचवेळा जोडुन असलेल्या कालावधीचे देयक सादर करताना एका दिवासाचा वास्तव्याचा खर्च दोन्ही देयकात आकारला जातो, तो एकाच देयकात नमूद करावा.

११. वैद्यकिय अग्रिम देयके बऱ्याचवेळा अचानक सादर करावी लागतात, अशा वेळेस जर संचालनालयातील संबंधितांना पूर्व कल्पना दिल्यास त्याप्रमाणे देयक तातडीने मंजूर करण्यात मदत होईल.

१२. जर वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयकात किरकोळ आक्षेप असल्यास संचालनालयाकडुन संबंधितास त्याची पूर्तता करावयास दुरध्वनीद्वारे सांगितले जाते. अशा वेळेस त्याची त्वरीत पूर्तता करावी.

१३. संचालनालयाकडुन ज्या वेळेस एखाद्या देयकाबाबत आक्षेप घेतला जातो त्या वेळेस संबंधित कर्मचाऱ्याने सादर केलेल्या खुलाशावर कार्यालय प्रमुखाने (कोषागार अधिकारी / सहसंचालक / अधिदान व लेखा कार्यालय) स्वतःचे स्पष्ट अभिप्राय देऊनच देयक सादर करणे आवश्यक आहे.

१४. काही ठराविक रुग्णालयामध्ये ठराविक उपचारासाठी पॅकेज ठरवुन दिलेले असतात, अशा वेळेस सदर पॅकेजचा तपशिल देयकाची अचूक परिगणना करण्यासाठी सादर करणे आवश्यक आहे.

१५. देयके संचालनालयात सादर करताना सोबत वित्त विभाग शासन निर्णय दि.६/९/२०१४ प्रमाणे चेकलिस्ट जोडावी.

१६. जर एखाद्या कर्मचाऱ्यास दि.१/५/२००१ पुर्वीची तीन पेक्षा जास्त मुले असतील तर सोबत निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यक्यता आहे.

१७. ज्या खाजगी रुग्णालयात इंन्टा ऑक्युलर लेन्स बसवली असल्यास त्याची किंमत शासकीय रुग्णालया इतकी सिमित करण्यात यावी.

१८. अधिक माहितीसाठी अधिदान व लेखा अधिकारी कार्यालयात देयके पारीत करतानाची चेकलिस्ट सोबत जोडली आहे.

1 thought on “शासकीय कर्मचारी वैद्यकीय खर्चाचे सर्व नियम व अटी सर्व माहिती पीडीएफ medical bill”

  1. please Share this GR
    शासन मान्य खाजगी रुग्णालयात बाहय रुग्ण म्हणून उपचार घेतल्यास सदर वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देय होत नाही मात्र शासन निर्णय ३१/१/२०१२ अन्वये शासकीय कर्मचारी / अधिकारी व त्यांचे कुटुंबिय यांच्यावर शासनमान्य रुग्णालयात हृदय विकाराशी संबंधित गंभीर आजारावर (हृदय शस्त्रक्रिया Heart Surgery, हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया Bypass surgery व अॅन्जोप्लास्टी – शस्त्रक्रिया) शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या बाहय रुग्ण (Follow up) उपचारावरील (वैद्यकिय सल्ला शुल्क, औषधे व तपासण्या) खर्चाची प्रतिपूर्ती रु.१५,०००/- मर्यादेपर्यंत अनुज्ञेय ठरविण्यात आले आहे.

Leave a Comment