“माझी ई-शाळा हा प्रकल्प” संपूर्ण राज्यात राबवला जाणार शाळांना डिजिटल अध्यापनाचे तंत्रज्ञान मिळणार mazi eshala digital projects

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“माझी ई-शाळा हा प्रकल्प” संपूर्ण राज्यात राबवला जाणार शाळांना डिजिटल अध्यापनाचे तंत्रज्ञान मिळणार mazi eshala digital projects 

राज्यातील १० हजार जिल्हा परिषद शाळांना मिळणार तंत्रज्ञानाची जोड

डिजिटल अध्यापनाचे तंत्रज्ञान ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध होणार !

प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या माध्यमातून १० हजार जिल्हा परिषद शाळांमध्ये माझी ई-शाळा हा प्रकल्प पुढील वर्षीच्या सत्रापासून

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (जि. वाशिम): समग्र शिक्षा

अभियान व प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या माध्यमातून १० हजार जिल्हा परिषद शाळांमध्ये माझी ई-शाळा हा प्रकल्प पुढील वर्षीच्या सत्रापासून संपूर्ण महाराष्ट्रभर राबविला जाणार आहे. याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटल अध्यापनाचे तंत्रज्ञान ऑफलाइन पद्धतीने शाळांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर यांनी दिली.

मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला व प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे सीईओ प्रेम यादव यांच्या बैठकीत

यासंदर्भातील करार झाला आहे. त्यापूर्वी हे त्यानुसार प्रथम इन्फोटेक करण्यासाठी फाउंडेशनची यंत्रणा जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटल अध्यापनाचे तंत्रज्ञान ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणार आहे. तंत्रज्ञान अवगत जिल्हास्तरावरील तज्ज्ञस्नेही शिक्षकांना पुणे येथे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये वाशिम, धाराशिव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील विषय तज्ज्ञ साधन व्यक्तीचा समावेश होता. टप्प्या-टप्प्यातील हे सर्व प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून त्या शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार.

प्रकल्पाचे जिल्हानिहाय तीन टप्पे

पहिल्या टप्प्यात वाशिम, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांतील दोन हजार शाळांमध्ये माझी ई-शाळा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, कोल्हापूर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, नाशिक, सोलापूर या १२ जिल्ह्यांत ३४०० शाळांमध्ये सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित १६ जिल्ह्यांतील ४६०० शाळांमध्ये २०२६-२७ पर्यंत हा प्रकल्प सुरू होणार असल्याचे प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक नीलेश ठाकूर यांनी सांगितले.

असा राबविणार प्रकल्प अध्यापनात डिजिटल साक्षरता अॅपचा वापर

शिक्षकांना टीव्ही-प्रोजेक्टरवर शिकविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार त्यानंतर हे अॅप प्रथमच कर्मचारी शाळेत पोहोचून इन्स्टॉल करणार शाळेला पासवर्ड दिल्यानंतर तीन वर्षे हा अॅप ऑफलाइन वापरता येईल.

राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना फायदा

राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १० हजार शाळांमध्ये ‘माझी ई- शाळा’ प्रकल्पांतर्गत २५ हजार वर्गाना डिजिटल अध्यापनाचा कटेंटमधून ३० हजार शिक्षकांना डिजिटल अध्यापनाचे कौशल्य देऊन राज्यातील सुमारे १० लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल.

माझी शाळा