नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्यासंदर्भात casual leave rules
शासन निर्णय, वित्त विभाग क्र. रेदष्टीई १४८१/सीआर-२७४/एवईआर-९, दिनांक २० मार्च १९८१ अन्वये, नैमित्तिक रजेच्या मागे आणि/किंवा पुढे कितीही रविवार आणि/किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची तसेच नैमित्तिक रजांच्यामध्ये येणा-या एक किंवा अधिक सुट्ट्या नैमित्तिक रजांना जोडून घेण्याची जी परवानगी दिलेली होती ती आता कायम स्वरूपात चालू ठेवण्याचा शासन आदेश देत आहे तथापी, एकावेळेस नैमित्तिक रजा व सुट्ट्या मिळून होणारा एकूण कालावधी सात दिवसांहून अधिक होता कामा नये व अपवादात्मक परिस्थितीत केवळ ही मर्यादा दहा दिवसांपर्यंत वाढवून देण्याबाबतची पूर्वीची शर्त तशीच कायम राहील
२० या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुवार व नांवाने,