माहे मार्च-२०२५ चे वेतन देयक सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत march payment karyavahi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माहे मार्च-२०२५ चे वेतन देयक सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत march payment karyavahi 

उपरोक्त विषयान्वये सुचित करण्यात येते की, माहे फेब्रुवारी २०२५ ची सर्व प्राथमिक शाळांची देयके, केंद्रप्रमुख / हायस्कुल ची देयक जिल्हा स्तरावरून Approve करण्यात आलेली आहेत.

* फेब्रुवारी २०२५ च्या देयकांचे लेखाशिर्ष निहाय प्रमाणक क्रमांक व दिनांक खालीलप्रमाणे आहेत

मार्च २०२५ देयक करतांना खालील बाबी प्राध्यान्याने कराव्या

* ज्या कर्मचाऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे मार्च-२०२५ चे वेतनामधुन नियमित NPS कपात करण्यात यावी.

* माहे फेब्रुवारी २०२५ च्या वेतनामध्ये देण्यात आलेला महागाई भत्ता फरक आपोआप शुन्य होईल याबाबत खात्री करण्यात यावी.

* समुह अपघात विमा योजनेची माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये ५३१/- प्रमाणे करण्यात आलेली कपात शुन्य करण्यात यावी

व्यवसाय कपात आपोआप २००/- प्रमाणे होईल याबाबत खात्री करण्यात यावी.

* ज्या शिक्षकांना आपली नियमित वेतनामधुन कपात होणार GPF वर्गणी वाढवयाची असले किया कमी कयावयाची असेल ती करावी असे बदल करतांना नियमिती वेतनामधुन कपात होणारी GPF वर्गणी ही मुळ वेतनाचे कमी कमी ६% व जास्तीत जास्त मुळ वेतना ऐवढी कपात होईल याची दक्षता द्यावी.

* सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये प्रलंबित असलेले माहे फेब्रुवारी २०२५ चे वेतन ऑनलाईन पध्दतीने अदा करण्याकरीता माहे मार्च २०२५ हा शेवटचा माहिना आहे त्यांनतर सदर वेतन हे सन २०२५-२६ मध्ये शालार्थ प्रणाली मधुन अदा करणे शक्य होणार नाही.

* जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येऊ नये.

* आयकर कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. (सन २०२४-२५ मध्ये कर्मचाऱ्यास पडलेला एकुण आयकर (TDS वजा जाता) / १०% प्रमाणे) अशा प्रकारे कपात करण्यात यावी. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे कि बऱ्याच कमर्चाऱ्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी मध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो असे यापुढे होणार नाही याची दक्षता घ्यावी.

* यानंतर कोणत्याही शिक्षकांचे प्रलंबित वेतन Broke Period मधुन विना पुर्व परवानगीने टाकण्यात येऊ नये. प्रलंबित वेतन अदा करावयाचे असल्यास प्रथम गटशिक्षणाधिकारी / हायस्कुल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीने जिल्हा कार्यालयास पत्र घ्यावे व जिल्हा कार्यालयाने सदर बाबतीत परवानगी दिल्यानंतरच प्रलंबित वेतन Broke Period मधून टाकण्यात यावे. यानंतर विनापरवानगी Broke Period असल्यास सदर देयक Reject करण्यात येईल.

* कोणत्याही परिस्थितीत Online देयकात नियमित वेतना व्यतिरीक्त इतर कोणतेही Arreas व प्रलंबित वेतन जिल्हा कार्यालयाचे परवानगी शिवाय टाकण्यात येऊ नये.

* Pay bill Generate केल्यानंतर DDO१ (मुख्याध्यापक) यांनी Inner Page तपासुनच देयक फॉरवर्ड करावे सर्व बदल योग्य झालेबाबत व Net Amount लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे.

* या कार्यालयाचे असे निर्देशनास आले आहे की, शिक्षक विभागास देयकाचे हॉर्ड कापी सादर करतांना वेतन फरकाचा तक्ता नियमित देयकासोबत जोडवायाचे प्रमाणपत्र सादर करण्यात येत नाही. माहे मार्च-२०२५ चे देयक याशिवाय स्विकारण्यात येणार नाही याची गांभियाने नोंद घ्यावी.

* या कार्यालयाचे असे निर्देशनास आले आहे की, बऱ्याचे पंचायत समिती हायस्कुल देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनालाईन जिल्हा कार्यालयास फॉरवर्ड करतात. पंरतु देयकाचे हॉर्ड कॉपी दिलेल्या विहीत मुदतीत सहाय्यक लेखाधिकारी यांचे स्वाक्षरीनिशी जिल्हा कार्यालयास सादर करत नाही.

* यानंतर E-kuber प्रणालीमार्फत वेतन जमा होणार असल्याने IFSC Code चुकीचा असला तर वेतन जमा होणार नाही व असे Failed झालेले वेतन परत करणेबाबतची प्रक्रिया खुप किचकट व वेळखाऊ असल्याने संबंधित कर्मचारी यांचे वेतन जमा होण्यास २ ते ३ महिन्याचा कालावधी लागू शकतो त्यामुळे यांनतर एकाही शिक्षकांनी जिल्हा कार्यालयाचे पूर्व परवानगी शिवाय आपला वेतनाचा Account Number& IFSC Code बदल करू नये.

Non Government Deduction हे प्रणालीमध्ये कपात करावे. Co-op Bank, Credit Society, Other Deduction, RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गटशिक्षणाधिकारी / हायस्कुल मुख्याध्यापक यांचे खातेवर व निव्वळ रक्कम शिक्षकांचे खातेवर जिल्हा स्तरावरून वर्ग करण्यात येईल. Shalarth मधील Bank Account Number व IFSC Code बरोबर असल्याबाबत दक्षता घ्यावी.

* Paybill Generate केल्यानंतर DDO १ (मुख्याध्यापक) यांनी Inner Page तपासूनच देयक फॉरवर्ड करावे. सर्व बदल योग्य झालेबाबत व Net Amount लाल रंगात येणार नाही याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावे. तसेच हॉर्ड कॉपी देयकासोबत Change Statement, Outer, Inner, Aquittance roll, Bank Statement महागाई भत्ता फरकाचे

Statement व नियमित देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र तसेच आयकर विवरण पत्र सही व शिक्क्यासह गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात दि. २८ मार्च २०२५ पर्यंत सादर करावे.

** प्राथमिक शिक्षकांचे यांचे DDO२(गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयकाचा Details Abstract Report पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मुळ देयकावरून (Excel file) तपासुन तालुक्याचा लेखाशिर्षनिहाय संकलीत नमुना-२६ तयार करावा व वेतन फरकाचे विवरण तयार करावे. देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये सर्वात वर वेतन फरकाचा नमुना, संकलीत नमुना-२६, Details Abstract Reports ची प्रॉट Bank Statement दिलेल्या फॉरमॅट मध्ये GPF Shedule याप्रमाणे तयार करून पंचायत समिती चे क.ले.अ. व स.ले.अ. यांची प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती लेखा विभागास दि. १ एप्रिल २०२५ पर्यंत सादर करावे.

* पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीनंतर सर्व शाळांची DDO २ (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके दिनांक ३ एप्रिल २०२५ ला सायकांळी ५.०० वाजेपर्यंत DDO ३ (शिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी.

** पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे प्रतीस्वाक्षरीनंतर सर्व प्राथमिक शाळांची देयकांच्या हार्ड कॉपी दिनांक ०४ एप्रिल २०२५ ला लेखा शाखा, शिक्षणविभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, अमरावती येथे नियमित देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, वेतन फरकाचा तक्ता (नाव वाढविले असेल किंवा कमी केले असेल त्यांचे नावासह), संकलीत करुन नमुना २६, बैंक यादी तसेच GPF Shedule, याप्रमाणे तसेच हायस्कुल बाबतीत नियमित देयकासोबत जोडावयाचे प्रमाणपत्र, शालार्थ प्रणालीमधील Change Statement, Outer, Inner, Aquitance, Bank Statement याप्रमाणे गट शिक्षणाधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीसह सादर कराव्या. (Non Government चे Shedule सोबत सादर करू नये अदा. LIC,Shikshan Bank and Non government schedule)

* दिनांक ०४ एप्रिल २०२५ ला ज्यांची स्वाक्षरीसह देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करण्याऱ्या पंचायत समितीस प्राध्यान देण्यात येईल तसेच विलंबाने प्राप्त होणाऱ्या पंचायत समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित DDO-१ व DDO-२ यांची राहील.

Join Now