महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याबाबत maharashtra vidhansabha paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याबाबत maharashtra vidhansabha paripatrak 

महोदय / महोदया,

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी म्हणून नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृतीपर उपक्रम स्वीप कार्यक्रमांतर्गत राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. आयोगाच्या सदर निर्देशानुसार सध्या राज्यभर स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि, सदर स्वीप कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.

👉👉महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 शासन परिपत्रक येथे पहा

यास्तव दिनांक ८/११/२०२४ ते १९/११/२००२४ या कालावधीमध्ये राज्यभर स्वीप कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी, यास्तव, दि.८ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता राज्यभर घ्याववयाच्या स्वीप कार्यक्रमाचे राज्यस्तरीय प्रक्षेपण (लॉचिंग) मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्वीप प्रक्षेपण कार्यक्रम थेट ऑनलाईन प्रसारीत करण्यात येणार आहे.

कृपया आपण आपल्या जिल्ह्यातील मुख्यालयी, तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दि. ८/११/२०२४ रोजी सायंकाळी ०५:०० वा. जिल्हास्तरीय व विधानसभा मतदारसंघ स्तरावरील स्वीप कार्यक्रमाच्या प्रक्षेपण कार्यक्रमाचे आपल्यास्तरावरुन आयोजन करावे. तसेच या कार्यक्रमामध्ये मतदानाची प्रतिज्ञा घेणे, निवडणूक गीत वाजवणे, जिल्हयातील मान्यवर व्यक्ती, प्रसिध्द कलावंत, खेळाडू यांच्याकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन ईत्यादी कार्यक्रम घेण्यात यावे. यावेळी जिल्ह्यातील स्वीप आयकॉन, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, जिल्ह्यातील नामवंत खेळाडू, नामांकित कलावंत तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांग या वंचित गटातील नामांकित व्यक्ती यांना आमंत्रित करण्यात याये. त्याचप्रमाणे, जिल्हयात राबवावयाच्या विविध स्वीप उपक्रमांचे वेळापत्रक सोबत जोडले आहे. सदर वेळापत्रकातील उपक्रमांसोबत आपण आपल्या स्तरावरुन इतर नाविन्यपूर्ण उपक्रमही राबवू शकता. दि. ८ ते १९ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीमध्ये आपल्या जिल्हयात विविध स्वीप उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात यावी, ही विनंती.

आपला,

(शरद दळवी

अवर

Join Now