शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) 2024 दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पेपर क्र.1 व 2 अंतिम निकाल जाहीर maha tet result declared 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) 2024 दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पेपर क्र.1 व 2 अंतिम निकाल जाहीर maha tet result declared

प्रसिध्दीपत्रक

शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) 2024 दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पेपर क्र. 1 व 2: अंतिम निकालाबाबत

शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक खालील प्रमाणे आहे 

https://mahatet.in/

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर । (इ. 1 ली ते 5वी गट) पेपर 2 (इ. 6 वी ते 8वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दि. 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. सदर निकालाबाबत दि. 01/02/2025 ते 06/02/2025 अखेर पर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉगिनद्वारे नोंदवुन घेण्यात आले होते. तसेच ईमेलद्वारे दि. 08/02/2025 ते 10/02/2025 अखेरपर्यंत आक्षेप मागविण्यात आलेले होते. सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करुन अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे. पेपर 1 व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.

पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प./ शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांचेमार्फत यथावकाश पाठविण्यात येईल.

दिनांक: 13/2/2024

ठिकाण : पुणे

Join Now