महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा निकाल जाहीर अधिकृत वेबसाईटवर निकाल पहा प्रसिद्धीपत्रक maha tet result link
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पेपर I(इ. १ ली ते ५ वी) पेपर II (इ. ६ वी ते ८ वी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
पेपर 1 व पेपर 11 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक ३१.०१.२०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटि/आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर दिनांक ०१.०२.२०२५ ते दिनांक ०६.०२.२०२५ पर्यंत उमेदवारांच्या लॉगीन मधुन ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल, अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०६.०२.२०२५ पर्यंत mahatet24.msce@gmail.com या इमेल वर पाठवावे. दिनांक ०६.०२.२०२५ नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.