बीएड सीईटी परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ 2025-26 परीक्षेची संभाव्य तारीख पहा maha b.ed cet exam online application 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बीएड सीईटी परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ 2025-26 परीक्षेची संभाव्य तारीख पहा maha b.ed cet exam online application 

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा प्राधिकरण, मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी B.Ed. CET Exam 2025-26 आणि B.Ed. ELCT CET परीक्षांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

बीएड सीईटी परीक्षेची नोंदणी तारीखः 

MAH.B.Ed-M.Ed (3 years Integrated) – CET-2025-26

प्रारंभ दिनांक 06/01/2025 to 06/02/2025

मुदतवाढ दिनांक 07/02/2025 to 22/02/2025

बीएड सीईटी परीक्षेची संभाव्य तारीख B.Ed. CET Exam 2025-26 दिनांक 24, 25 आणि 26 मार्च 2025

बीएड सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी वेबसाईट लिंक उपलब्ध

या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया आणि माहितीपत्रक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरावा.

बीएड सीईटी परीक्षा केंद्र:

बीएड सीईटी परीक्षा 2025-26 विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.

MAH-B.ED CET 2025-26 परीक्षेसाठी पुर्वापेक्षित पात्रता व अटी 

• उमेदवाराने पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा बसणे (appear) आवश्यक आहे.

• माहितीपुस्तीकेतील सूचना अवगत असूनही उमेदवाराने अर्ज केला असेल तर त्यांनी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अथवा इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये समायोजित होणार नाहीत.

संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी. एन.टी.(ए) /(एन.टी. (बी) / एन.टी. (सी) / एन.टी. (डी) / सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग/विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.

• दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

• शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी. (ओ.एम.एस.) रु.१०००/-

महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी. (बी) / एन.टी (सी)/एन.टी (डी)/सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग /विशेष मागास वर्ग/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/दिव्यांग उमेदवार) रु. ८००/-

• सर्व अनाथ/लिंग – इतर उमेदवारांना रु. ८००/- शुल्क अदा करावे लागेल.

• उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे.

• एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

• ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.

भरलेल्या आणि शेवटी सादर केलेल्या माहितीसाठी उमेदवार जबाबदार आहेत.

• कृपया आपला आप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.

• कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.

उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन

सूचनाकरिता https://cetcell.mahacet.org/या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.

• एका अर्ज फॉर्मसाठी उमेदवार फक्त एक मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरू शकतो.

• ज्या उमेदवारांनी आपले शालांत परीक्षेपासूनचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे अशा उमेदवारांनी बी.एड सीईटीसोबत इंग्रजी विषय ज्ञान चाचणीस (ELCT) अर्जात होकार दयावा.

• एकदा ऑनलाईन अर्ज सादरकेल्यावर इंग्रजी विषय ज्ञान चाचणीचा (ELCT) पर्यायात बदल करता येणार नाही याची अर्जदारांनी गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.

• अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सूचना व माहिती पुस्तिका वाचली आहे असे समजण्यात येईल