लोकसभा निवडणुक-2024 मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी क्रमांक 1,2,3, यांची कामे loksabha election polling officer work’s 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोकसभा निवडणुक-2024 मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी क्रमांक 1,2,3, यांची कामे loksabha election polling officer work’s

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🖥️केंद्राध्यक्ष यांचे कर्तव्य व जबाबदारी👉 pdf download 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🖥️मतदान अधिकारी क्र.1 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🖥️मतदान अधिकारी क्र.2 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🖥️मतदान अधिकारी क्र.3 यांचे कर्तव्य व जबाबदारी 👉pdf download 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पहिला मतदान अधिकारी कामे

प्रथम मतदान अधिकारी कडे चिन्हांकित मतदार यादी असेल. .

मतदाराची ओळख पटविण्याची जबाबदारी त्याची असेल

मतदार प्रथम या मतदान अधिका-याकडे जाईल. व स्वतःचे नाव सांगेल किंवा BLO/उमेदवार यांनी दिलेली मतदाराचे नाव व अनुक्रमांक नमूद असलेली ओळखचिट्ठी दाखविल. तथापि मतदान अधिकाऱ्यांना अशा ओळखचिट्ठीची सक्ती करता येणार नाही.

loksabha election polling officer work's
loksabha election polling officer work’s

* मतदाराचे मतदार यादीतील नाव शोधुन मतदान अधिकारी १ मतदाराला ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगतील. निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार ओळखपत्र वा ओळखीसाठी आवश्यक इतर पुरावे अनिवार्य केलेले आहेत. (प्रत्येक निवडणुकीवेळी आयोग इतर ओळखीचे

पुरावेबाबत आदेश जाहीर करील.) पुरावा दिला नसल्यास मतदाराला मत नोंदविण्यासाठी परवानगी देऊ नये.

मतदाराच्या नावाचा तपशिल मतदान अधिकारी मोठ्याने वाचून दाखवतील. ज्याद्वारे उपस्थित प्रतिनिधी यांना मतदाराचे ओळखीबाबत खात्री करून घेता येईल.

मतदाराची फोटो ओळखपत्रावरून किंवा ओळखिच्या इतर पुराव्यावरून ओळख पटल्यानंतर अशा मतदाराचे चिन्हांकित मतदार यादीतील नाव लाल शाईने तिरपी रेषेत काट करेल.

* पुरुष व स्त्री मतदारांची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी स्त्री मतदारांच्या अनुक्रमांकाला गोल करण्यात येईल. आणि तृतीय पंथी मतदारांच्या अनुक्रमांक जवळ एक चांदणी (STAR) खुण करण्यात येईल.

* फक्त व्होटर सुचना स्लिप (Voter Information Slip) च्या आधारे मतदारास मतदान करता येणार नाही. VIS घेऊन येणाऱ्या मतदारास ओळखपत्र किंवा इतर ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

• मतदान केंद्रावर पडदानशीन (बुरखाधारी) महिला मतदार पुरेसे असतील तर त्या महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला मतदान अधिकारी यांची नेमणुक केली जाईल.

सत्यमेव जयते

विशेष प्रसंगी पहिला मतदान अधिकारी कार्यवाही

निर्वाचन आयोग

* एखादी व्यक्ती मतदान ओळखपत्रसह आली तरी देखील त्याचे/तिचे नाव मतदार यादीत नसेल तर ती व्यक्ती मतदान करू शकत नाही.

* ज्या मतदारांना टपाली मतपत्रिका देण्यात आलेल्या आहेत, AVSC, AVPD, AVES, AVCO मतदार बाबत चिन्हांकित मतदार यादीत PB म्हणुन चिन्हांकित केले असेल तर मतदान केंद्रात मतदान करण्यास परवानगी देता येणार नाही.

* मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप आल्यानंतर अशा मतदाराला व आक्षेपकाला मतदान केंद्राध्यक्षकडे पाठवावे.

* परदेशी (Oversees) मतदारांसाठी त्यांची ओळख मूळ पारपत्र (passport) आधारेच पटविता येईल. * मतदाराच्या ओळखीविषयी खात्री झाली असेल तर मतदारांच्या यादीत मतदाराच्या नावांच्या नोंदीसंबंधी झालेल्या केवळ लिपिकीय दोषांकडे किंवा छपाईच्या चुकांकडे दुर्लक्ष करावे.

* राजकीय पक्ष/उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांनी मतदारांना दिलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्यावर उमेदवाराचे नाव, पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह असू नये. मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी यांच्या लक्षात आणून द्यावी. असे प्रकार ताबडतोब थांबविण्यास सांगावे. उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडून देण्यात आलेली चिट्ठी ओळख पटविण्याचा मान्यताप्राप्त दस्तऐवज नाही.

दुसरा मतदान अधिकारी कामे

Works of polling officer
Works of polling officer

निर्वाचन आयोग

दुसरा मतदान अधिकारी कडे पक्की शाई, मतदार नोंदवही (१७अ), मतदार चिठ्ठी असेल.

मतदान करून देण्यासाठी पक्क्या शाईची खुण करणे तसेच मतदार नोंदवही मध्ये मतदाराची नोंद करून सही अंगठा घेणे व मतदारास मतदार चिट्ठी देणे हे कर्तव्य.

पक्क्या शाईची खुण करणे-

• मतदान अधिकारी २ मतदारांच्या डाव्या हाताची तर्जनी पाहील आणि त्यावर शाईची निशाणी नाही ना याची खातरजमा करील आणि नंतर त्यावर शाईचे चिन्ह करील. हे चिन्ह अशा रितीने करण्यात येईल की शाई नखाच्या मुळात आणि नखावरील कातडीवर पसरेल आणि त्यामुळे तर्जनीवर शाईची स्पष्ट खुण राहील.

• मतदाराने डाव्या हाताची तर्जनी तपासुन घेण्यास किंवा खुण करून घेण्यास नकार दिला किंवा अगोदरच खुण असेल तर त्याला मतदान करण्यास परवानगी देऊ नये.

• मतदाराच्या बोटावर शाई लावण्याची पद्धत

१. डाव्या हाताच्या तर्जनीवर

२. डाव्या हाताची तर्जनी नसल्यास बाजूच्या इतर बोटावर

३. उपरोक्त दोन्ही नसल्यास उजव्या हाताच्या तर्जनीवर

४. उपरोक्त तीनही नसल्यास उजव्या हाताच्या उपलब्ध बोटावर

५. दोन्ही हात नसल्यास डाव्या किंवा उजव्या हाताच्या उपलब्ध भागाच्या टोकावर

• मतदार नोंदवही (नमुना १७ अ) मतदाराची नोंद करून सही/अंगठा घेणे

दुस-या मतदान अधिका-याकडे नमुना १७ मध्ये मतदार नोंदवही (voter regi.) असेल, तो नोंदवहीत ओळख पटविलेल्या मतदारांची नोंद ठेवील व मतदाराची नोंदवहीवर स्वाक्षरी अथवा अंगठयाचा ठसा घेईल.

• मतदाराच्या फोटो ओळखपत्राच्या/ओळख पुराव्याच्या प्रकाराच्या व क्रमांकाच्या नोंदी मतदार नोंदवहीत घेईल.

• मतदाराने नोंदवहीवर स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा करण्याचे नाकारल्यास त्याला मतदान करू देऊ नये.

• मतदार सही करू शकत नसेल तर डाव्या हाताचा अंगठा ठसा घ्यावा. तो साक्षांकित करण्याची गरज नाही.

• मतदाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल तर उजव्या हाताचा अंगठा घेण्यात यावा. दोन्ही हाताचे अंगठे नसतील तर डाव्या हाताच्या तर्जनी पासुन सुरवात करून कोणत्याही एका बोटाचा ठसा घेण्यात यावा. डाव्या हाताला बोटे नसतील तर उजव्या हाताच्या बोटांचा ठसा घेण्यात यावा. जर त्याला बोटे नसतील तर मत नोंदविणे सहज शक्य नसल्याने सोबत्याची सही किंवा अंगठा घ्यावा व शेरा कॉलम मध्ये तसे नमूद करावे.

• मतदाराची स्वाक्षरी म्हणजे साक्षर मतदाराचे बाबतीत नाव व आद्याक्षरे.

• ASD मतदारांचे बाबतीत सही सोबत अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा.

• CSV मतदाराने नियुक्त केलेल्या Proxy मतदाराचे मत नोंदविण्यापुर्वी अशा मतदाराचा CSV मतदार यादीतील क्रमांक कॉलम २ मध्ये नमूद करावा. व कंसात PV नमुद करून अशा मतदाराच्या मधल्या बोटावर शाईची खुण करण्यात यावी.

• मतदार नोंदवही नमुना १७ अ मधिल नोंदी

१) मतदारांची नोंदवही (नमुना १७ अ) मध्ये प्रथम मतदार स्वाक्षरी करण्यापुर्वी मतदान अधिकारी, मतदान केंद्राध्यक्षसह नोंदवही तपासुन घेईल. आणि नमुना १७ अ मध्ये “नियंत्रण युनिट तपासणी केली आहे. व एकूण शुन्य असल्याचे आढळले आहे” अशी शाईने नोंद करेल.

२) पहिल्या रकान्यात अनुक्रमांक १ ने सुरवात करून लागोपाठ क्रमाने अनुक्रमांक लिहावे. ३) दूसऱ्या रकान्यात मतदाराचा मतदान यादीतील अनुक्रमांक नमुद करावयाचा आहे.

४) तिसऱ्या रकान्यात मतदाराने EPIC द्वारे ओळख पटविली असेल तर त्याबाबतीत EP, मतदान छायाचित्र असेल तर क्रमांक लिहण्याची गरज नाही. इतर पुराव्याच्या बाबतीत दाखविलेल्या पुराव्याच्या क्रमांकाचे शेवटचे चार अंक नमूद करावेत. तसेच पुराव्याचा प्रकार नमुद करावा.

५) चौथ्या रकान्यात स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा.

६) पाचव्या रकान्यात आवश्यकतेनुसार मतदानास नकार, गोपनीयता भंग, EDC मतदार, Test Vote अशा नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यात याव्यात.

७) मतदान प्रकिया संपल्यानंतर शेवटचे मतदाराचे नोंदीखाली लाल शाईने आडवी रेघ ओढून त्याखाली “नमुना १७ अ मधिल शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक…. असा आहे.” अशी नोंद करून केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी करावी.

• मतदाराला मतदार चिड्डी देणे-

मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्या शाईची खुण केल्यानंतर त्याच्याशी संबंधित नोंद मतदार यादीत घेतल्या नंतर आणि त्या नोंदवहीत सही / अंगठा घेतल्यानंतर दुसरा मतदान अधिकारी त्या मतदारासाठी मतदार चिट्ठी देईल.

मतदान साहित्यात मतदार चिठ्ठ्या पुरविण्यात येतील. मतदाराला मतदार चिट्ठी दिल्यानंतर CU चा प्रभारी असलेल्या तिसऱ्या मतदान अधिकारी कडे मतदारास जाण्यास निर्देश करील.

मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदान अधिकारी कडे जमा झालेल्या चिठ्ठ्या पुरविण्यात आलेल्या लिफाफ्यात मोहोरबंद करून साहित्यात संकलन केंद्रावर जमा केल्या जातील.

तिसरा मतदान अधिकारी कामे

Works of polling officer
Works of polling officer

निर्वाचन आयोग

• कंट्रोल युनिट मतदान अधिकारी ०३ च्या ताब्यात राहील. मतदाराकडून मतदार चिड्डी (Voter slip) जमा करुन घेईल. व

मतदाराच्या बोटाला शाईची खुण केल्याची खातरजमा करील. • कंट्रोल युनिट (CU) मधुन BALLOT बटण दाबुन मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जाण्याची परवानगी

देतील. बॅलेट बटण दाबल्यानंतर CU वरील Busy Lamp लागल्याची व मतदाराने मत नोंदविल्यानंतर बीप आवाज आल्याची खात्री करतील.

दर दोन तासांनी व अंतिम नोंदविलेल्या मतांची आकडेवारी जमा झालेल्या मतदार चिड्डी व CU वरील Total बटण दाबुन केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांना पुरवतील.

मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदान अधिकारी कडे जमा झालेल्या चिठ्ठ्या पुरविण्यात आलेल्या लिफाफ्यात मोहोरबंद करून साहित्यात संकलन केंद्रावर जमा केल्या जातील.

 

1 thought on “लोकसभा निवडणुक-2024 मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी क्रमांक 1,2,3, यांची कामे loksabha election polling officer work’s ”

Leave a Comment