सन २०२५ मध्ये या दोन दिवशी स्थानिक सुट्टी मिळणार शासन परिपत्रक local holidays
गोपाळकाला (दहिहंडी) व अनंत चतुर्दशी निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत…
शासन परिपत्रकः
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः सार्वसु-११२४/प्र.क्र.९१/जपुक (२९)
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगरु चौक,
मुंबई- ४०० ०३२
दिनांक : १८ डिसेंबर, २०२४.
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय /निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येते. त्यानुसार सन २०२५ मध्ये पुढीलप्रमाणे मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत.