विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या रजा रोखीकरण रकमेवर व्याज अदा करण्याबाबत leave rokhikaran
१) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांचे पत्र क्र.का.९/आस्था-२/ श्री.एस.श्री.राठोड/१८४३/२०२३, दिनांक ०२.०६.२०२३.
२) वित्त विभाग अधिसूचना क्रमांक सेनिये/१००८/७७/सेवा-४/दिनांक ०१.११.२००८.
शासन निर्णय येथे पहा
👉👉pdf download
३) महालेखापाल कार्यालय मुंबई. (ले. व ह.) यांचे क्र. PR-११/Ch-३/OUR-AHDDD/ UOR/६१२७९६७३/६११४६०८१, दिनांक ०१.०९.२०२३.
४) मा. प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ येथे मूळ अर्ज क्र. २३/२०२२ मध्ये दिनांक ०९.१२.२०२२ रोजी पारित केलेले आदेश.
५) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र. आस्थाप-२०२३/८५५/प्र.क्र.२३५/म-१, दिनांक १२.०९.२०२३.
प्रस्तावना :-
श्री.एस.बी. राठोड, सेवानिवृत्त दुय्यम निबंधक श्रेणी-१, धुळे यांना विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती वेतनावर महालेखापाल कार्यालय, मुंबई यांनी परिगणीत केलेली रक्कम व संदर्भ क्रमांक २ येथील अधिसूचनेतील नियम ३ च्या तरतूदीमधील प्राप्त अधिकारानुसार रुपये २,१९,२०७/- इतके व्याज प्रदान करण्याचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक ५ अन्वये निर्गमित करण्यात आला आहे.
मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ, औरंगाबाद येथे श्री. राठोड यांनी दाखल केलेल्या मूळ अर्ज क्र.२३/२०२२ मध्ये मा. न्यायाधिकरणाने, “श्री. राठोड यांना अदा करण्यात आलेल्या रजा रोखीकरणाच्या रकमेवर व्याज देण्याचे” आदेश 0.8/92 / 2022 रोजी पारित केले. यास अनुसरुन वित्त विभाग व विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात आले. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी श्री. राठोड यांना रजा रोखीकरण रक्कमेच्या विलंबाची रक्कम अदा करण्याकरिता ८ टक्के व्याज दराने परिगणीत करुन दिलेली रक्कम खालील प्रमाणे : –
याअनुषंगाने श्री.एस.बी. राठोड यांना विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या रजा रोखीकरणावर व्याज अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :
श्री.एस.बी. राठोड, सेवानिवृत्त दुय्यम निबंधक श्रेणी-१, धुळे यांना रजा रोखीकरण रक्कमेच्या विलंबाची रक्कम (रुपये ९१,८६०/-) ८ टक्के व्याजाने अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
०२. प्रस्तुत प्रकरणी होणारा सेवानिवृत्ती तात्पुरते उपदान व पेन्शन विक्री रकमेवरील व्याजाचा खर्च हा २०७१ या लेखाशिर्षामधून भागविण्यात यावा.
०३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अधिसुचना क्रमांक सेनिवे/१००८/७७/सेवा-४/ दिनांक १.११.२००८ व शासन निर्णय क्र.अरजा-२४९६/२०/सेवा-९, दिनांक २०.०६.१९९६ मधील तरतूदीनुसार प्रशासकीय विभागास प्राप्त अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०२०२१८२९५७५३१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने