केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात राज्य शासन राजपत्र kendrapramukh rajpatra 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात राज्य शासन राजपत्र kendrapramukh rajpatra 

केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती,

(१) पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षपिक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून, पात्रतेच्या अधीन राहून, ज्येष्ठतेच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल.

(दुय्यम शैक्षणिक) प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक

(३)

(२) शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार, त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून आणि ज्याने,

(अ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए. किंवा बी.कॉम. किंवा बी.एस्सी. ची पदवी धारण केलेली आहे;

(ब) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) म्हणून जिल्हा परिषदेत किमान सहा वर्षे अखंड सेवा केली आहे; २. केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे ५०:५० या प्रमाणात करण्यात येईल.

३. (१) केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ मधील तरतुदींनुसार किंवा याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य नियम, आदेश किंवा इतर संसाधनानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक आहे. (२) लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन सादर केल्याच्या दिनांकास दोनपेक्षा अधिक मुले असलेली व्यक्ती या नियमांनुसार नियुक्त केलेल्या सेवेत नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. (३) या नियमानुसार नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीची शासन सेवेत नियुक्ती झाल्यानंतर, अशा व्यक्तीस नियुक्तीच्या वेळी किंवा त्यांनतर त्याला दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्यास, ती या पदावर सेवा चालू ठेवण्यासाठी अपात्र ठरेल.

४. केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीची ज्येष्ठता यादी जिल्हा स्तरावर ठेवण्यात येईल.

५. केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती;

(१) तो ज्या जिल्ह्यात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर कार्यरत असेल त्याच जिल्ह्यामध्ये पदोन्नतीसाठी पात्र असेल;

(२) तो ज्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) म्हणून काम करत आहे त्या जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनियुक्तीसाठी किंवा अशा कोणत्याही बदलीसाठी पात्र असणार नाही.

६. या नियमान्वये केंद्रप्रमुख पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम, १९६७ मधील तरतुदी आणि या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी जारी केलेले कोणतेही नियम, आदेश किंवा कोणतीही संसाधने लागू राहतील.

केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात शासन परिपत्रक

Join Now

2 thoughts on “केंद्रप्रमुख पदोन्नती संदर्भात राज्य शासन राजपत्र kendrapramukh rajpatra ”

  1. केंद्र प्रमुख पदासाठी अहर्ता बी एड असावी.
    पूर्ण पदे कार्यरत शिक्षकांतून भरावीत.

  2. कें द्र प्रमुख पदासाठी अहर्ता बीएड असावी पूर्ण पदे कार्यरत शिक्षक मधून भरावी

Leave a Comment