शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्राथमिक शाळांना जयंती पुण्यतिथी व सुट्ट्यांची यादी jayanti punyatithi and holidays
परिपत्रक १) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. ०९/११/२०२३ च्या अधिसूचना व सार्वजनिक सुट्ट्या २०२४ चे परिपत्रक.
२) मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडिल दिनांक २३/११/२०२३ चे स्थानिक सुट्यांचे पत्र.
३ ) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१५६/प्र.क्र.२०६/ एसडी-२ दि.०८/०९/२०१५
४) मा. मुख्य कार्यकारी अधिकारीसो यांचेकडील मंजूर टिप्पनी दि. १५/०२/२०२४ दि.१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेर जिल्हा परिषद कोल्हापूर कडील प्राथमिक शाळांना द्यावयाच्या
दिवाळी, दिवाळी (बलिप्रतिपदा), गुरुनानक जयंती अनुक्रमे दि.०१/११/२०२४, दि.०२/११/२०२४, दि.१५/११/२०२४ या शासकीय सुट्टया दीर्घ सुट्टयामध्ये घेतलेल्या आहेत. उर्दू शाळांना दि. ०९/०९/२०२४ ते दि. १२/०९/२०२४ ची गौरी गणपती सुट्टी घेणेची नाही. त्याऐवजी उर्दू शाळांनी १) शबे महेराज बुधवार दि. ०७/०२/२०२४, २) शबे बरात सोमवार दि. २६/०२/२०२४, ३) शबेकदर बुधवार दि. ०६/०४/२०२४, ४) रमजान ईद (दुसरा दिवस) शुक्रवार दि. १२/०४/२०२४ सुट्टी घेणेची आहे. सोमवार दि.१९/०८/२०२४ रोजी रक्षाबंधन सुट्टी ऐवजी उर्दू शाळांनी बकरीद ईद दुसरा दिवस मंगळवार दि. १८/०६/२०२४ रोजी एक दिवस शाळा सुट्टी घेण्यात यावी व रक्षाबंधन सुट्टी दिवशी शाळा पूर्ण वेळ भरवावी.
श्रावण सोमवार/रमजान (उर्दू शाळा) व इतर सर्व सकाळच्या शाळांची वेळ ७.२० ते ११.३० राहील.
उन्हाळी शाळा दि. १८/०३/२०२४ पासून सकाळी ०७.२० ते ११.३० वाजेपर्यत भरवण्यात याव्यात.
सुट्टयासंबंधी सुचना :-
अ) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण २०१५/ प्र.क्र.२०६/ एस डी २ मंत्रालय मुंबई यांचेकडील दि.८ सप्टेंबर २०१५ रोजीच्या राज्यातील धार्मिक सण व उत्सव इ. च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांना सुट्टयांच्या नियोजनाबाबत शासन निर्णयानुसार पालक शिक्षक संघ शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये सुट्टयांच्या नियोजनाबाबत निर्णय घेऊन मान्यता घेणेत यावी.
ब) मा.जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या व केंद्र शासनाकडून आकस्मित जाहीर झालेल्या सुट्टया घेणेच्या आहेत. क) मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती मान्यतेने १ जानेवारी २०२४ पासून स्थानिक सुट्टया निश्चित
करुन गट शिक्षण अधिकारी यांची मंजुरी घ्यावी. ड) ज्या सुट्टीच्या दिवशी जयंती /पुण्यतिथी / वर्धापनदिन येतात त्या दिवशी पुर्ण नियोजन करुन कार्यक्रम
आयोजित करावयाचे आहेत. इ) महिना अखेर शाळा अर्धा दिवस भरवून शिक्षकांनी पुर्ण वेळ थांबून मासिक कामे त्याच दिवशी पुर्ण करणेची
आहेत.
ई) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण २०२४/ प्र.क्र.२७/ एस डी ४ मंत्रालय मुंबई
यांचेकडील दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या शाळा कायमपणे सकाळी सत्रात भरतात त्या शाळांनी सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करुन पूर्व प्राथमिक ते इ. ४ थी पर्यतचे वर्ग सकाळी ०९-०० किंवा ०९-०० नंतर भरविणेत यावे.
• उर्दू शाळांसाठी सुट्टयासंबंधी सुचना
अ) उर्दू शाळांनी मुस्लिम दिनदर्शिका विचारात घेवून मा. शिक्षणाधिकारी यांचे पुर्व परवारनगीने आवश्यक असलेस सुट्टया एक दिवस पुढे मागे करुन घ्याव्यात.
ब) रमजान महिन्यात उर्दू शाळांची वेळ ७.०० ते ११.३० अशी राहील इ.१ ली २ री वर्ग सकाळी ११.०० वाजता सोडणेस यावेत. परंतू शिक्षकांनी ११.३० वाजेपर्यंत थांबावे.
• जेथे शिप्ट पध्दत आहे तेथील पहिल्या सत्राची वेळ सकाळी ७.०० ते ११.३० राहील व दुपार च्या सत्राची वेळ
१२.३० ते ५.०० पर्यंत राहील (फक्त उन्हाळयात)
वरील सुट्टया खेरीज कोणत्याही सुट्टया कार्यालयाचे परवानगी शिवाय घेता येणार नाही.
शाळेच्या वार्षीक तपासणीची सुट्टी वरिष्ठ अधिका-यांच्या मान्यतेने घ्यावी.
शाळेच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरु होण्याची तारीख शासन परिपत्रकानुसार निश्चित केली जाईल. काही बदल
झाल्यास सुट्टीच्या यादी मध्ये बदल होईल
सुट्टीनंतर शाळेच्या दिवशी उपस्थितीचे प्रमाण ९० टक्के पेक्षा अधिक राहील हे पहावे.
सार्वजनिक व स्थानिक सुट्टया ७६ व एकूण रविवार ५२ असे एकत्रीत १२८ दिवसांचे सुट्टीचे नियोजन आहे व किमान २३७ दिवस शालेय कामकाजासाठी आहेत. उन्हाळी व दिवाळी सुट्टीचे नियोजन खालील प्रमाणे.