बँक ऑफ महाराष्ट्रकडून खातेदाराच्या वारसदारांना ४० लाखांच्या अपघात विम्याचा लाभ insuarance of bank of maharashtra 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक ऑफ महाराष्ट्रकडून खातेदाराच्या वारसदारांना ४० लाखांच्या अपघात विम्याचा लाभ insuarance of bank of maharashtra 

मध्यम प्रकल्प पाटबंधारे उपविभाग चांदूर बाजार येथील कनिष्ठ लिपिक दीपक देशभ्रतार यांचा ८ नोव्हेंबर २०२३ रोजी रस्ता अपघातात मृत्यू झाला. ते २०१२ पासून बँक ऑफ महाराष्ट्रच्या चांदूर बाजार शाखेचे खातेदार असून, त्यांचे वेतन याच खात्यात जमा होत होते. बँकेच्या नियमानुसार वेतन खातेदाराच्या खात्याला अपघात विमा योजना संलग्न आहे. नियमानुसार, मयत खातेदाराच्या वारसदारांना विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक शाखा प्रबंधक कौशल किशोर यांनी मयत

खातेदाराच्या मृत्यू संबंधित सर्व दस्तऐवज अंचल प्रबंधक उमेश पराते यांच्या मार्गदर्शनात प्रधान कार्यालयात सादर केले. प्रधान कार्यालयाच्या पाठपुराव्याने दिपक देशभ्रतार यांच्या पत्नी स्मिता यांच्या खात्यात ४० लाखांचा धनादेश विमा योजना संरक्षण लाभ म्हणून जमा केला. यावेळी अंचल प्रबंधक उमेश पराते उपस्थित होते.

Leave a Comment