मुख्याद्यापक यांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील वाहन भत्ता (फरकासह) अदा करणे बाबत hm traveling allowance
संदर्भः- १. वित्त विभाग शासन निर्णय क्र. वाहन २००९/प्र.क्र.७८/सेवा५/दिनांकः-५ एप्रिल २०१०.
२. वित्त विभाग शासन निर्णय क्र. वाहन २०२०/प्र.क्र.०३/सेवा५/दिनांकः-२५ एप्रिल २०२२. ३. महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याद्यापक महासंघ जि. नांदेड यांचे पत्र दि. १३.०५.२०२४.
उपरोक्त संदर्भीय पत्र क्र.५ अन्वये शासकिय कर्मचा-यांना वाहतुक भत्ता लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन नियम-२०१९) अन्वये राज्य शासकिय कर्मचा-यांना दि.०१.०१.२०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्य शासकिय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर केलेला वाहतुक भत्याच्या दरात संदर्भ क्र.२ अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे.
संदर्भ क्र.३ अन्वये महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याद्यापक महासंघ जि. नांदेड यांनी उन्हाळी मुट्टीचे कालावधीत वाहतूक भत्ता कपात केल्या बाबत या कार्यालयास कळवून कपात करण्यात आलेला बाहतूक भत्ता शासन निर्णयानुसार मुख्याद्यापकांना मिळणे बाबत विनंती केली आहे. करिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काम करणा-या अपग्रेड मुख्याद्यापकांना उन्हाळी मुट्टीचे
कालावधीत माहे मे-२०१० पासुन कपात केला जात असलेला वाहतूक भत्ता संदर्भीय शासन निर्णय क्र.१ व २ च्या
तरतुदीच्या अधिन राहून लागु करण्यात येत आहे.
तरी ज्या मुख्याद्यापकांचा उन्हाळी सुट्टीमध्ये वाहतूक भत्ता कपात करण्यात आलेले आहे. त्यांना तात्काळ वाहतूक भत्याची रक्कम फरकासह अदा करण्यात यावी. तसेच माहे मे-२०२४ च्या वेतन देयकात मुख्याद्यापकांना वाहतूक भत्ता समाविष्ट करावा.
सोवतः संदर्भीय पत्राची छायांकित प्रत.