FLN पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी मुद्देनिहाय सूचना fundamental literacy and numeric
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत FLNAT परीक्षेनंतर मूल्यमापन करून अमाक्षरांची आवश्यक माहिती प्राप्त गुणांसह excel sheet मध्ये अचूकपणे नोंदवून जिल्ह्याची एकत्रित एकच excel sheet सादर करणेबाबत.
संदर्भ १) केंद्रशासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्लनी यांचे परीक्षा आयोजानाबाबतचे पत्र दि.२६/०२/२०२४.
२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परीक्षा दि. १७/०३/२०२४ साठी क्षेत्रीय अधिकारी व केंद्र संचालकांसाठी सूचना पुस्तिका.
३) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परीक्षा पूर्वतयारी बाबत online (VC) बैठकीत वेळोवेळी दिलेल्या सूचना.
उपरोक्त विषयानुसार केंद्रशासनासच्या निर्देशानुसार उल्लास नब भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परिक्षेचे राज्यामध्ये रविवार दि.१७ मार्च २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षेच्या आयोजनाबाबत वेळोवेळी ऑनलाईन (VC) बैठकीद्वारे, पत्राद्वारे तसेच मार्गदर्शक पुस्तिकेद्वारे आपणास कळविण्यात आलेले आहे
सदर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेसाठी देण्यात येणारी प्रश्नपत्रिका (Password protected) Soft copy मध्ये या कार्यालयाकडून आपणास ई-मेल द्वारे देण्यात आलेली आहे. रविवार दिनांक १७मार्च २०२४रोजी परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणी व गुणदानाबाबत यापूर्वी मविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार परीक्षेनंतर नवमाक्षरांना देण्यात येणाऱ्या गुणदान पत्रकासह साक्षरता प्रमाणपत्र (Marksheet Cum Literacy Certificate) तयार करण्यामाठी नवसाक्षरांची आवश्यक असणारी माहिती अचूक नोंदविण्यासाठी ४५ मुद्यांची व ५३ रकान्यांची excel sheet soft copy या पत्रासोबत आपणास देण्यात येत आहे सदरील excel sheet मधील माहिती बिनचूक नोंदविण्यासाठी शाळा मुख्याध्यापक / केंद्रसंचालक व Data entry करणारी व्यक्ती यांना आपल्यास्तरावरून सोबत दिलेल्या मुद्देनिहाय मार्गदर्शक सूचनेनुसार मार्गदर्शन करावे तसेच आपल्या स्तरावर माहिती अचूक असल्याची खात्री करून आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची माहिती तपासून संकलित एकच excel sheet मध्ये खाली दिलेल्या निर्देशानुमार शिक्षण संचालनालय (योजना) पुणे या कार्यालयास दिनांक १९/०३/२०२४ रोजी email द्वारे वेळेत पाठवण्याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा जिक्षणाधिकारी (योजना) यांची असेल.
निर्देश :-
१) सर्व माहिती फक्त इंग्रजीत CAPITAL LETTERS व अंक इंग्रजीतच भरलेले असावेत.
२) Excel Sheet मधील सर्व रकाने अचूक नोंदविणे अनिवार्य आहे.
३) सर्व रकाण्यातील माहितीचा ताळमेळ बसणे आवश्यक आहे.
४) परीक्षा केंद्र (CENTRE CODE) व मूल्यमापन केंद्राचा (ASSESSMENT CENTRE CODE) कोड एकच आहे.
५) आधारकार्डची माहिती परीक्षार्थीकडून आधारकार्ड हार्ड कॉपी पाहून अचूक भरावी तथापि आधार कार्ड ची माहिती भरणे अनिवार्य नाही.
सातवा वेतन फरक व त्रुटी pdf download
६) EXCEL SHEET नमुना प्राप्त होताच परीक्षेपूर्वी उपलब्ध असलेली माहिती भरून पूर्वतयारी करून ठेवावी व परीक्षेनंतर गुणदान नोंदी कराव्यात जेणेकरून विहित कालावधीत माहिती सादर करणे शक्य होईल.
सोबत – १) EXCEL SHEET नमुना
२) EXCEL SHEET अचूक भरणेबाबत मार्गदर्शक सूचना.