तलाठी यांना प्रत्येक मतदान केंद्रासाठी रक्कम रू. २१००/- (अक्षरी रूपये दोन हजार शंभर फक्त) इतका निधी उपलब्ध election mandhan
मा. भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक ०७.०५.२०२४ रोजी ४०-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०६.०५.२०२४ रोजी मतदान पथकातील कर्मचारी हे मतदान केंद्रावर पोहंचनार आहेत. दिनांक ०६.०५.२०२४ रोजी मतदान पथकात ४ मतदान कर्मचारी, १ चतुर्थश्रेणी कर्मचारी व १ पोलीस कर्मचारी असे एकूण ६ कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तर दिनांक ०७.०५.२०२४ रोजी उक्त सर्व ६ कर्मचारी, शिवाय BLO व आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका असे कर्मचारी असणार आहेत.
दिनांक ०६.०५.२०२४ व दिनांक ०७.०५.२०२४ रोजी उक्त नमुद कर्मचारी यांची मतदान केंद्रावर खालील प्रमाणे व्यवस्था करावयाची आहे.
मतदान पथकातील कर्मचाऱ्यांसाठी उक्त तक्त्यामुध्ये नमुद केलेल्या व्यवस्था करणेसाठी संबंधीत तलाठी यांना प्रत्येक मतदान केंद्रासाठी रक्कम रू. २१००/- (अक्षरी रूपये दोन हजार शंभर फक्त) इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उक्त प्रस्तावीत व्यवस्था ही संबंधीत मतदान केंद्र ज्या सज्जा अंतर्गत आहे त्या तलाठी यांनीच करावयाची आहे व संबंधीत मंडळ अधिकारी यांनी या सर्व कामकाजाचे सनियंत्रण करायचे आहे.
उपरोक्त प्रमाणे तलाठी यांनी मतदान पथकाची वरील प्रमाणे व्यवस्था करण्यास हयगय अथवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीतांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई अनुसरण्यात येईल.
This is very small price