मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत-अतिरिक्त सूचना cm yuva karya traning instructions
प्रस्तावना:-राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता संदर्भाधीन दि. ०९.०७.२०२४ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन दि. ०९.०९.२०२४ च्या शासन निर्णयान्वये अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
शासन शुद्धिपत्रक :
संदर्भाधीन दि. ०९.०९.२०२४ च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक ६ येथील प्रथम परिच्छेद वगळण्यात येत असून त्या ऐवजी पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे:-
६) उद्योग आधार/उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांतील (MSME) आस्थापनांना खालील प्रमाणात उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी रुजू करुन घेता येतील:-
उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत MSME आस्थापनांतील कार्यरत मनुष्यबळाची संख्या २० पेक्षा अधिक असलेल्या उत्पादन (Manufacturing) व सेवा (Service) क्षेत्रातील आस्थापनांना त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाच्या अनुक्रमे १० टक्के व २० टक्के उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी रुजू करुन घेता येतील.
शासन शुद्धिपत्रक क्रमांका कौविड-२०२४/प्र.क्र. ११८/प्रशा-२
वरील सुधारणेनुसार उमेदवार रुजू करण्यापूर्वी संबंधित आस्थापनांत होत असलेल्या कामकाजाशी संबंधित शैक्षणिक अर्हता / कौशल्य रुजू होणाऱ्या उमेदवारांकडे आहे किंवा नाही, याची खातरजमा संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी करुन त्यास मान्यता द्यावी. तद्नंतरच उमेदवारांना संबंधित आस्थापनेत रुजू करुन घ्यावे.
२. DPIIT यांच्याकडे नोंदणीकृत स्टार्ट अप्स (Start Ups) क्षेत्रातील आस्थापनांना कार्यप्रशिक्षणासाठी उमेदवार रुजू करुन घेण्याबाबतची तरतूद कायम राहील.
सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०९१६१५५५१५७००३ असा आहे. हे शासन शुद्धिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.