विविध टप्प्यांवर EVM व VVPAT बदलल्यास – करावयाची कार्यपध्दती change evm,cu,bu,vvpat 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विविध टप्प्यांवर EVM व VVPAT बदलल्यास – करावयाची कार्यपध्दती change evm,cu,bu,vvpat 

मॉक पोल दरम्यान मशिन बदलविण्याची कार्यपध्दती

BU, CU आणि VVPAT बाबत सर्व प्रकारचे ERROR संदेश हे केवळ CU वर दर्शविले जातात. असा मॅसेज वाचल्यावर मशिन बदलावयाचे असल्यास CU स्वीच ऑफ करा.

प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापुर्वी बदलण्यात आलेले अकार्यान्वित/नादुरुस्त EVM (CU, BU, VVPAT किंवा त्याचे भाग) मतदान केंद्रावर ठेऊ नयेत. ते Sector officer च्या ताब्यात देऊन त्या मशिनवर व बाहेरील पेटीवर ‘MOCK POLL REPLACED’ असे स्टिकर लावावे.

मॉक पोल दरम्यान बदललेले मशिन- स्टिकर

NOTE:

1. Provide adhesive stickers with inscription ‘MOCK POLL REPLACED’ to Sector Officers for affixing on carrying case of rejected BU/CU/VVPAT replaced during mock poll.

2. Paste ‘MOCK POLL REPLACED’ sticker on non-functional Machines carrying cases.

3. Specification of sticker:

i) Dimension: 15 cm x 10 cm

ii) Color: Pink for AC and White for PC elections.

मॉक पोल दरम्यान युनिट बदलण्यासंदर्भात

> प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापुर्वी एखादे युनिट (CU, BU, VWPAT) नादुरुस्त । अकार्यान्वित असल्याचे निदर्शनास आल्यास फक्त तेवढेच युनिट बदलण्यात यावे आणि नवीन युनिटसह मॉक पोल करण्यात यावा.

याबाबतचा अहवाल ‘जोडपत्र-५’ (केंद्राध्यक्षाच्या अहवालातील) भाग-४ मध्ये देण्यात यावा.

बदललेले नादुरुस्त । अकार्यान्वित युनिट क्षेत्रीय अधिका-याकडे द्यावे.

मतदान प्रक्रियेदरम्यान मशीन बदलल्यास

मतदान चालू असताना कोणत्याही कारणास्तव CU अथवा BU मध्ये काही बिघाड झाल्यास संपूर्ण सेट बदलावा लागेल.

मतदान प्रक्रियेदरम्यान मशीन बदलण्याची वेळ आल्यास प्रथम CU वरील मतदान क्लोज करा, स्वीच ऑफ करा, VVPAT चा मागचा नॉब आडवा करा व त्यानंतरच बदलाची प्रक्रिया सुरु करा.

बदलापूर्वीच्या मशीन्स मतमोजणीसाठी ठेवाव्या लागतात.

मतदान प्रक्रियेदरम्यान मशीन बदलल्यास

> CU, BU बदलल्यास प्रत्येक उमेदवार व नोटा यांना एक मत देऊन मॉक पोल करावा लागेल. त्यानंतर CRC करुन मतदान यंत्रे सील करावी लागतील.

> या मॉक पोल दरम्यानच्या स्लिप काढून, Mock Poll Slip असा शिक्का मारुन काळया पाकिटात ठेवून नंतर VVPAT चे ड्रॉप बॉक्सचे झाकण सीलबंद करुन नंतरच पुढील मतदान सुरु करता येईल.

मतदान प्रक्रियेदरम्यान मशीन बदलल्यास

> मतदानादरम्यान केवळ VVPAT बदलल्यास फक्त ड्रॉप बॉक्स सील करुन मशीन वापरात आणावे. यावेळी मॉक पोल करता येणार नाही. जुने मशीन मतमोजणीसाठी ठेवावे लागेल. मशीन बदलताना CU स्वीच ऑफ करणे व त्यानंतरच बदल करणे महत्वाचे आहे.

> VVPAT बदलल्यानंतर नविन VVPAT चा पेपर लॉक नॉब उभा करणे महत्वाचे आहे. त्याशिवाय CU चालू करु नये. असे न केल्यास VVPAT मध्ये एरर येईल. त्यामुळे VVPAT चा नॉब उभा करुनच CU ऑन करावे हे लक्षात ठेवा.

CU ची बॅटरी बदलण्यासंदर्भात

> मॉक पोल दरम्यान किंवा मतदाना दरम्यान अथवा मतदानानंतर CU ची बॅटरी कार्य करीत नसल्यास अथवा Low Battery असा मॅसेज आल्यास अशी बॅटरी बदलण्यात यावी.

> बॅटरी बदलण्याची कार्यवाही मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान प्रतिनिधी व Sector Officer च्या उपस्थितीत करावी. Address Tag वर मतदान प्रतिनिधी व Sector Officer च्या स्वाक्ष-या घ्याव्यात. याबाबतचा अहवाल मतदान

केंद्राध्यक्षाच्या अहवालातील भाग-२ (जोडपत्र-५) मध्ये नमूद करावा.

मतदान सुरु झाल्यानंतर अथवा मतदानानंतर CU ची बॅटरी बदलल्यास परत मॉक पोलची आवश्यकता नाही.

प्रत्यक्ष मतदानादरम्यान युनिट बदलण्यासंदर्भात

> जर प्रत्यक्ष मतदान सुरु झाल्यानंतर (मतदानादरम्यान) BU किंवा CU नादुरुस्त । अकार्यान्वित आढळल्यास BU+CU+VVPAT असा संपूर्ण संच बदलण्यात यावा.

> त्यानंतर बदललेल्या नवीन संचावर प्रत्येक उमेदवारास (NOTA धरुन) प्रत्येकी १ मत देऊन मॉक पोल घेण्यात यावा.

> अशा परिस्थितीत ‘जोडपत्र-५’ चा भाग-१ व भाग-५ मध्ये मतदान केंद्राध्यक्ष यांनी अहवाल तयार करावा व भाग-५ क्षेत्रीय अधिका-याकडे द्यावा.

एकापेक्षा अधिक वेळा वरीलप्रमाणे बदल झाल्यास प्रत्येक वेळी वरील प्रक्रिया अवलंबण्यात आली.

प्रत्यक्ष मतदानादरम्यान युनिट बदलण्यासंदर्भात

> जर प्रत्यक्ष मतदान सुरु झाल्यानंतर (मतदानादरम्यान) CU वर “Low Battery VVPAT” असा मॅसेज आल्यास VVPAT ची बॅटरी बदलवावी. अशा परिस्थितीत मॉक पोल घेण्याची आवश्यकता नाही तसेच कोणताही वेगळा अहवाल तयार करण्याची आवश्यकता नाही.

जर VVPAT योग्य प्रकारे कार्य करीत नसल्यास केवळ VVPAT बदलावे. अशा परिस्थितीत मॉक पोल घेण्याची आवश्यकता नाही. तथापि केंद्राध्यक्षाच्या अहवालातील भाग-५ तयार करुन क्षेत्रीय अधिका-यास सुपुर्द करावा.

मशीन बदलल्यास – महत्वाच्या बाबी

कोणत्याही परिस्थितीत VVAPT ड्रॉप बॉक्स उघडू नका जोडणी करताना/ काढताना CU बंद करा लाल- काळा कलर कोड जुळवूनच जोडणी

करा

CU स्वीच ऑन करण्यापूर्वी VVPAT चा स्वीच अनलॉक पोझिशन वर ठेवा