मतदान यंत्राबाबत येणारे मेसेजेस व त्यांचे अर्थ voting machine errors 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान यंत्राबाबत येणारे मेसेजेस व त्यांचे अर्थ voting machine errors 

मतदान यंत्रातील होणारे बिघाड व मेसेजेस

Link Error:

सर्व केबल कनेक्शन्स तपासून पहा. कनेक्शन चुकीचे झाल्यास देखिल लिंक एरर येते. त्यामुळे एकापेक्षा अधिक BU असल्यास ती योग्य क्रमाने जोडली आहेत याची खात्री करा. जोडतांना BU02-BU01 VVPAT -CU याच क्रमाने जोडले आहे याची खात्री करा.

BU किवा VVPAT not found:

असा मेसेज कनेक्शन सैल असल्यास किंवा जोडले नसल्यास येतो. असा मेसेज आल्यास सर्व कनेक्शन्स नीट जोडा. कनेक्शन जोडताना व सुटी करताना CU स्विच ऑफ करायचे लक्षात असू द्या.

Clock Error:

हा मेसेज आल्यास संपूर्ण सेट क्षेत्रिय अधिका-याकडून बदलून घ्या.

Invalid Error:

हा मेसेज मशिनमधील डेटा क्लीअर करतांना येतो. याचा अर्थ CRC प्रक्रिया योग्य क्रमाने केलेली नाही. हा मेसेज आल्यानंतर Close-Result- Clear या क्रमाने पुन्हा मशीन्स क्लीअर करा.

Press Error:

BU वरील एखादे बटन अडकल्यास ही Error येते. यासाठी उपस्थित उमेदवार किंवा प्रतिनिधी यांच्या समोर BU ची बटने तपासावी. बटन अडकले असल्यास ते सोडविण्याचा प्रयत्न करावा. हे करतांना बॅलट सोडलेले नाही याची पूर्ण खात्री करावी.

व्हीव्हीपॅटबाबत येणारे मेसेजेस व त्यांचे अर्थ

VVPAT Battery Low:

ज्यावेळेस VVPAT ची बॅटरी लो होते त्यावेळी हा मेसेज येतो. त्यावेळी क्षेत्रिय अधिका-याकडून VVPAT ची अधिकची बॅटरी मागवून ती बदलावी. बॅटरी बदलत असतांना मशिन बंद करावे व बॅटरी बदलावी व नंतर

मशीन सुरु करावे.

Deplete Error:

ज्यावेळी पेपर रोलमध्ये शेवटचे २५ स्लिप प्रिंट करण्याएवढा पेपर शिल्लक राहील त्यावळी हा मेसेज येतो. अशावेळी क्षेत्रिय अधिका-याकडून VVPAT ची मागणी करुन तो बदलून घ्यावा.

Change VVPAT:

VVPAT संबंधी 2.1 ते 2.14 पैकी कोणतेही Error आल्यास त्यावेळी फक्त VVPAT बदलावा.

Paper Left:

VVPAT मध्ये पेपर अडकल्यास हा मेसेज येतो. त्यावेळी VVPAT बदलावा लागतो.