क्षयरोग/कर्करोग/कुष्ठरोग/पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचान्यांना रजाबाबत शासन निर्णय cancer tb laprocy leave gr
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ डिसेंबर २००५
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक अरजा. २४०५/प्र.क्र. १६/सेवा-८. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ यांच्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी याद्वारे पुढील नियम करीत आहे
१. (i) या नियमांना, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) (सुधारणा) नियम, २००५ असे म्हणता
येईल.
(ii) हे नियम दिनांक १ जानेवारी २००६ पासून अंमलात येतील.
२. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील परिशिष्ट तीनमध्ये, नियम ३ नंतर, पुढील नियम समाविष्ट करण्यात येईल:-
” नियम ३अ. अर्जित रजेची गणना.
भाग चार-अ–१४६
(६६६) [किंमत : रुपये ७.०० ]
६६७
महाराष्ट्र शासन राजपत्र, असा., डिसेंबर ३१, २००५/ पौष १०, शके १९२७
[भाग चार-अ
(अ) क्षयरोग/कर्करोग/कुष्ठरोग/पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचान्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या परिशिष्ट तीन मधील विद्यमान तरतुदीप्रमाणेच कमाल एक वर्षाच्या मर्यादेपर्यंत सलग पूर्ण वेतनी विशेष रजा मंजूर करण्यात आल्यावर, पुढील अर्ध्या वर्षाच्या सुरुवातीस त्यांच्या खाती जमा करावयाची अर्जित रजा अशा विशेष रजेच्या कालावधीच्या १/१० परंतु कमाल १५ दिवसांपर्यंत इतकी कमी करण्यात येईल,
(ब) अर्जित रजा जमाखाती टाकताना, रजेच्या अपूर्ण दिवसाचे रुपांतर नजीकच्या पूर्ण दिवसामध्ये करण्यात येईल.”.