नविन रजा नियम pdf उपलब्ध new leave rules pdf available
रजा नियम
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१
शासकीय अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासनाने राजपत्रातील अधिसुचनेद्वारा जाहीर केलेल्या सण व इतर सुट्ट्या वगळून प्रतीवर्ष महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्वये खाते प्रमुखाकडे अर्ज देऊन, तो मान्य झाल्यावर खालील प्रमाणे रजा उपभोगता येते.
सुट्टी: अ) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९ (२३) अन्वये परक्राम्य संलेख अधिनियम १८८१, कलम २५ अन्वये विहीत केलेली अथवा अधिसूचित केलेली सुट्टी.
ब) शासनाने राजपत्रातील अधिसूचनेद्वारा, शासकीय कार्यालय कामापुरते बंद ठेवण्याचा दिलेला आदेश.
रजाः महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याने कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी
हक्क म्हणून रजा मागता येत नाही.
रजा मंजूर करण्यास सक्षम अधिकाऱ्यास आवश्यकतेनुसार रजा नाकारण्याचा रद्द करण्याचा अधिकार असतो.
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना सतत पाच वर्षाहून अधिक कालावधी करीता कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही.