निवडणूक कर्तव्य आदेश रद्द होणेसाठी कारणे व लागणारे आवश्यक पुरावे येथे पहा cancel election duty evidences causes
विधानसभा निवडणूक 2024 यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी ड्युट्या लागलेल्या आहेत परंतु काही कर्मचारी अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कारणामुळे निवडणूक कर्तव्य ड्युटी रद्द करणे गरजेचे असते अशावेळी त्यासाठी असणारी कारणे व ती ड्युटी रद्द करण्यासाठी लागणारे आवश्यक पुरावे खालील प्रमाणे आहेत
अनु. | निवडणुक आदेश रद्द करणे बाबत कारण | (आवश्यक पुरावे) जोडलेल्या कागदपत्रांचा तपशील |
1 | अधिकारी/ कर्मचारी दिव्यांग असल्याबाबत | दिव्यांग असल्याबाबत सक्षम अधिकारी यांचा दाखला जोडावा |
2 | अधिकारी/ कर्मचारी गरोदर असल्याबाबत | गरोदर असले बाबत सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला जोडावा |
3 | अधिकार/ कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असले बाबत | संबंधित अधिकारी/ कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणाचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्षासह स्पष्ट शिफारस पत्र |
4 | अधिकारी/ कर्मचारी स्तनदा माता असले बबत | स्तनदा माता असले बाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा |
5 | अधिकारी/ कर्मचारी निलंबित असले बबत | संबंधित अधिकारी/ कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणाचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे |
6 | अधिकारी/ कर्मचारी फरार असले बाबत | संबंधित अधिकारी/ कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणाचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे |
7 | अधिकारी/ कर्मचारी दीर्घ मुदतीचे रजेवर असले बाबत | संबंधित अधिकारी/ कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे. निवडणूक आदेश दिनांकपूर्वी मान्य रजेचे प्रकरण जोडावे |
8 | अधिकारी/ कर्मचारी दिनांक 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत असले बाबत | संबंधित अधिकारी/ कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह पत्र जोडावे सेवा पुस्तक नोंद जोडावी |
9 | अधिकारी/ कर्मचारी गंभीर आजारी असले बाबत | १. गंभीर आजारी असले बाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा २. संबंधित अधिकारी /कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे |
10 | अधिकारी/ कर्मचारी हे देशाबाहेर खाजगी कामासाठी मान्य प्रवासी रजेवर असले बाबत | संबंधित अधिकारी/ कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे (निवडणूक आदेश दिनांक रजेचे प्रकरण व व्हिसा व विमान तिकिटे जोडावे) |
11 | अधिकारी/ कर्मचारी हे शासकीय कामानिमित्त परदेशी अथवा देशांतर्गत प्रवास करीत असले बाबत | संबंधित अधिकारी/ कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शीक्यासह स्पष्ट पत्र जोडावे |
12 | अधिकारी/ कर्मचारी यांचे मतदान केंद्रावरील दुबार आदेश असले बाबत | ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी /कर्मचारी कामास तयार आहेत त्या विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावी व मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रद्द करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी |
13 | अधिकारी/ कर्मचारी हे निवडणुकीचे कामासाठी अन्य विधानसभा मतदारसंघाकडे कार्यरत असले बबत | आ) ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अधिकारी /कर्मचारी प्रत्यक्ष कामास आहेत त्या विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेशावर शिफारस करावे ब ) अधिकारी/ कर्मचारी यांना जे काम दिले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करावा मतदान केंद्रावरील नियुक्तीचा जो आदेश रद्द करावयाचा आहे त्याची स्पष्ट छायाप्रत जोडावी |
14 | कर्मचारी चतुर्थ श्रेणी class -4 मध्ये कार्यरत असले बाबत | मतदान केंद्रावरील नियुक्ती बाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे आय कार्ड ओळखपत्रासह इत्यादीचा संदर्भ घेऊन स्पष्ट शिफारस करावी |
15 | अधिकारी/ कर्मचारी हे वरिष्ठ पदावर ( नायब तहसीलदार, तहसीलदार, सहाय्यक आयुक्त, व या श्रेणी पेक्षा वरील श्रेणी परंतु महसूल,मनपा विभागाशी संबंधित अधिकारी तसेच आयएएस व समकक्ष) कार्यरत असले बाबत | मतदान केंद्रावरील नियुक्ती बाबत तहसीलदार यांनी योग्य कागदपत्रे आय कार्ड ओळखपत्र इत्यादीचा संदर्भ घेऊन स्पष्ट शिफारस करावे |
16 | अधिकारी/ कर्मचारी यांची जिल्हा बाहेर बदली झाली असले बाबत | संबंधित अधिकारी /कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणी विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे (बदली आदेश व कार्यमुक्ती आदेश जोडावा) |
17 | अधिकारी/ कर्मचारी मयत झाले बाबत | संबंधित अधिकारी/ कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणचे विभाग प्रमुख यांचे सही शिक्यासह स्पष्ट पत्र जोडावे |
18 | अधिकारी/ कर्मचारी यांचा अपघात झाला असले बाबत | अपघात झाला असलेबाबत सक्षम वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला जोडावा अधिकारी/ कर्मचारी यांचे कुटुंबीयांकडून अर्ज आला असल्यास अपघातग्रस्त अधिकारी /कर्मचारी यांचे चालू दिनांक असलेले छायाचित्र जोडावे |
19 | अधिकारी/ कर्मचारी यांचा स्वतःचा किंवा मुलाचा मुलीचा विवाह असल्याबाबत मतदान दिनांक पूर्वी व नंतर तीन दिवस इतर नातेसंबंधातील अर्ज स्वीकारू नये | छापील लग्नपत्रिका व कार्यालय बुकिंग पावती रजिस्टर विवाह असल्यास रजिस्ट्रेशन कार्यालयाकडे टोकन पावती सादर करावी |
अस