व्होटर स्लिप; जिथे तक्रारी, तिथे बीएलओंना बजावली नोटीस ! Block level officers
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : लोकसभा निवडणुकीचे
मतदान २६ एप्रिलला असल्याने व्होटर स्लिप २१ एप्रिलपर्यंत वाटप करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, शहरात काही भागांत व्होटर स्लिप मिळाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्या भागात तक्रारी प्राप्त आहेत. तेथील बीएलओंना एआरओंद्वारा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.
मतदान केंद्र शोधणे सोयीचे जावे व मतदार यादीतील मतदारांच्या क्रमांकदेखील असल्याने मतदान प्रक्रियेचा वेळ वाया जात नाही, शिवाय राजकीय पक्षाच्या चिठ्ठया मतदान केंद्रात जात नाहीत. त्यामुळे निवडणूक विभागाद्वारा व्होटर स्लिप बीएलओंद्वारा वाटप करण्यात आल्या; मात्र काही बीएलओंद्वारा काही भागांत वाटप करण्यास टाळाटाळ केल्याने त्या भागातील मतदारंना व्होटर स्लिप मिळू शकल्या नाहीत.
त्यामुळे मतदारांना मतदान केंद्र शोधताना त्रास झाला तर काहींनी मतदान करायचे टाळल्याचाही प्रकार घडला आहे. त्यामुळे ज्या भागात